दबंग सलमान खान कोणावर चिडला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2017 09:58 IST2017-06-06T11:56:48+5:302017-06-07T09:58:11+5:30

बॉलिवूडचा सुल्तान सलमान खानने पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने बीईंग ह्युमन ब्रान्डच्या बॅनरखाली इलेक्ट्रिक सायकल लाँच करण्यात आली. यावेळी सलमानला विचारण्यात ...

Dabangg Salman Khan angry with whom? | दबंग सलमान खान कोणावर चिडला ?

दबंग सलमान खान कोणावर चिडला ?

लिवूडचा सुल्तान सलमान खानने पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने बीईंग ह्युमन ब्रान्डच्या बॅनरखाली इलेक्ट्रिक सायकल लाँच करण्यात आली. यावेळी सलमानला विचारण्यात आलेल्या प्रश्नांमुळे तो चांगला चिडला होता. सलमानचा राग हा सर्वांच्या परिचित आहे. सलमान लवकरच टॅलेंट हंट कंपनी सुरु करणार आहे. याबाबत सलमानला प्रश्न विचारण्यात आला तो प्रश्न होता तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारच्या टॅलेंटवर फोकस करणार आहात. या प्रश्नानंतर भाईजानचा राग अनावर झाला. सलमन उत्तर देताना म्हणाला, अजून याबाबत काही विचार केला नाही आहे, जास्त उडू नकोस  कार्यक्रम बीईंग ह्युमनचा सुरु आहे त्यासंबंधी प्रश्न विचारा. आधी तुम्ही ट्युबलाइट चित्रपटावर पोहोचलात आतातर तुम्ही डायरेक्ट माझ्या कंपनीकडे वळलात, तुम्ही माझे काम करणार आहात का असा उलट सवाल सलमानने विचाराला. यानंतर मात्र सलमानने आपल्या राग नियंत्रण ठेवता पुढच्या प्रश्नांची उत्तर द्यायला सुरुवात केली.  

सलमनाच्या कंपनी तर्फे लाँच करण्यात आलेल्या या इलेक्ट्रिक सायकलची किंमत 40 हजाराहुन सुरुवात होते. या सायकलचे टॉप मॉडेल 57 हजारांचे आहे. गेल्या दीड वर्षांपासून या सायकलला विकसित करण्याचे काम सुरु होते. ही सायकल पूर्णपणे इको फ्रेंडली आणि इलेक्ट्रिकवर चार्ज होते. सायकलचा वेग प्रतितास  25 किलोमीटर आहे. 


सलमान खान सध्या ट्यूबलाइटच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे. हा चित्रपट 1962 साली झालेल्या भारत-चीन युद्धावर आधारित आहे. कबीर खान आणि सलमान यांच्या जोडीचा हा तिसरा चित्रपट आहे. ‘ट्यूबलाइट’ चित्रपटात सलमानने लक्ष्मण नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे.चित्रपटात सोहेल खानचीदेखील महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

Web Title: Dabangg Salman Khan angry with whom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.