महेश कोठारे आणि सोनाली चालवणार ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’

By Admin | Updated: September 24, 2016 01:56 IST2016-09-24T01:56:01+5:302016-09-24T01:56:01+5:30

‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमाचे परीक्षण रेणुका शहाणे आणि मकरंद देशपांडे करत होते.

'Comedy Bullet Train' to run Mahesh Kothare and Sonali | महेश कोठारे आणि सोनाली चालवणार ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’

महेश कोठारे आणि सोनाली चालवणार ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’


‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमाचे परीक्षण रेणुका शहाणे आणि मकरंद देशपांडे करत होते. पण काही दिवसांपूर्वी त्यांनी या कार्यक्रमाचा निरोप घेतला. आता या कार्यक्रमात खूप बदल करण्यात आले आहेत. एका नव्या ढंगात ही ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे आता महेश कोठारे आणि सोनाली कुलकर्णी या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत. याविषयी सोनाली सांगते, ‘‘मी हा कार्यक्रम करण्यास खूपच उत्सुक आहे. मी या कार्यक्रमात अनेकवेळा प्रमोशनसाठी आले होते. त्यामुळे या कलाकारांचे स्कीट मी जवळून पाहिले आहेत. मी या सगळ्याची फॅन आहे. त्यामुळे परीक्षण करताना मी त्यांच्या अभिनयाचे अथवा परफॉर्मन्सचे परीक्षण करणार नसून केवळ एक प्रेक्षक म्हणून मला काय पाहायला आवडेल हे त्यांना सांगणार आहे. परीक्षण करण्यासाठी नव्हे तर त्यांचे कौतुक करण्यासाठी मी कार्यक्रमाचा भाग होणार आहे असे मी आवर्जुन सांगेन.’’

Web Title: 'Comedy Bullet Train' to run Mahesh Kothare and Sonali