विक्रम गोखलेंचे छोट्या पडद्यावर कमबॅक

By Admin | Updated: May 8, 2017 05:42 IST2017-05-08T05:42:09+5:302017-05-08T05:42:09+5:30

चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांतून व्यक्त होणाऱ्या भावना आणि तितकीच प्रभावी संवादफेक यांमुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान

Comeback on Vikram Gokhale's small screen | विक्रम गोखलेंचे छोट्या पडद्यावर कमबॅक

विक्रम गोखलेंचे छोट्या पडद्यावर कमबॅक

चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांतून व्यक्त होणाऱ्या भावना आणि तितकीच प्रभावी संवादफेक यांमुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळविणारे कलाकार म्हणजे अभिनेता विक्रम गोखले. पुन्हा एकदा रसिकांना छोट्या पडद्यावर विक्रम गोखले यांचा विलक्षण अभिनय अनुभवता येणार आहे. विक्रम गोखले यांनी पूर्वी अनेक मालिकांमध्ये काम केले होते. पण, काही वर्षांपासून त्यांनी छोट्या पडद्यापासून दूर राहणेच पसंत केले आहे. पण आता ते अनेक वर्षांनंतर पुन्हा मालिकेत झळकणार आहेत. या मालिकेत विक्रम गोखले प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आजोबा आणि नातीच्या हळुवार नात्यावर आधारित या मालिकेची कथा असेल. विक्रम गोखले भूमिका साकारत असलेली ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत विक्रम गोखले यांच्यासोबत कोण-कोण कलाकार असणार, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलेले आहे.

Web Title: Comeback on Vikram Gokhale's small screen