तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार करा पेहरावाची निवड - प्रिया कटारिया पुरी

By Admin | Updated: January 1, 2017 04:06 IST2017-01-01T04:06:09+5:302017-01-01T04:06:09+5:30

छान राहणं, सुंदर दिसणं व स्वत:ला वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट करणं प्रत्येकालाच आवडते. दिवसागणिक त्यात भरच पडत आहे. या रोजच्या वेगळ्या आणि हटके लूकसाठी आपल्या वॉर्डरोबमध्ये

The choice of dress for your personality - Priya Kataria Puri | तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार करा पेहरावाची निवड - प्रिया कटारिया पुरी

तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार करा पेहरावाची निवड - प्रिया कटारिया पुरी

छान राहणं, सुंदर दिसणं व स्वत:ला वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट करणं प्रत्येकालाच आवडते. दिवसागणिक त्यात भरच पडत आहे. या रोजच्या वेगळ्या आणि हटके लूकसाठी आपल्या वॉर्डरोबमध्ये डेनिम जीन्स, टी शर्ट, कुर्ते, स्कर्टस, साडी अशा काही खास गोष्टी असतातच. प्रसंगानुरूप आपण आपला पोशाख निवडतो. उदाहरणार्थ काही वेळा फिक्या रंगाच्या टी-शर्टवर ब्लेझर आणि डार्क शेडची डेनिम जीन्स तुम्हाला हटके स्टायलिश लूक देऊन जाईल. डेनिम जीन्ससोबत योग्य टॉपची निवड केलात आणि योग्य अ‍ॅक्सेसरीज निवडल्या की लूकला ग्रेस येते. केवळ कोणते कपडे घालतो यावर लूक अवलंबून नसतो तर तो कोण कसा कॅरी करतो आणि त्यावर निवडलेल्या अ‍ॅक्सेसरीज यामुळेही लूकमध्ये खूप फरक पडतो. इम्प्रेसिव्ह लूकसाठी कपड्यांसोबतच तुमच्या मूडला आणि तुमच्या आॅकेजनला सूट होईल अशी अ‍ॅक्सेसरीज निवडा. खूप ओव्हरड्रेसिंगही करू नका. एक लक्षात असू द्या, तुम्ही कपडे कितीही स्टायलिश घातलेत तरीही तुम्हाला ते योग्यपद्धतीने कॅरी करता आले पाहिजेत. लग्न समारंभात साडी, पंजाबी ड्रेस, अनारकली जे तुम्हाला आवडेल आणि तुमच्या पर्सनालिटीला सूट होईल असाच पोशाख निवडा. हल्ली बाहेरच नाही तर घरातही ट्रेंडी कपडे घालण्यात सगळ्यांचाच कल दिसून येतो. मात्र घरी असताना घट्ट कपडे घालण्यापेक्षा सैल असणारे कपडे घालावेत. विविध प्रकारच्या हॉट पँटस, शॉर्टस, थ्री फोर्थ, टी शर्ट, ट्रॅक पँटस यातूनही फॅशन मेटेंन केली जाऊ शकते.

Web Title: The choice of dress for your personality - Priya Kataria Puri