अबब! सुपरस्टार राम चरणच्या एका घड्याळाची किंमत पाहा; किमान ८ घर खरेदी करू शकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 03:07 PM2023-03-27T15:07:58+5:302023-03-27T15:08:51+5:30

RRR सिनेमाच्या या अभिनेत्याकडे सर्वात कमी किंमतीचे घड्याळ आहे तेदेखील लाखो रुपयांचे

Check Out Superstar Ram Charan's Watch Price; You can buy at least 8 houses | अबब! सुपरस्टार राम चरणच्या एका घड्याळाची किंमत पाहा; किमान ८ घर खरेदी करू शकाल

अबब! सुपरस्टार राम चरणच्या एका घड्याळाची किंमत पाहा; किमान ८ घर खरेदी करू शकाल

googlenewsNext

नवी दिल्ली - राजामौली यांचा सिनेमा RRR चं कौतुक देशासह विदेशातही होत आहे. या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता राम चरणला आता हॉलिवूडमधूनही ऑफर येत असल्याची चर्चा आहे. सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा असण्यासोबतच राम चरण याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सिनेमातील या हिरोच्या कामाचं कौतुक सगळेच करतात पण प्रत्यक्षातही राम चरण लग्झरी लाईफ जगणाऱ्या राजासारखं जीवन जगतो. 

आज म्हणजे २७ मार्चला राम चरण याचा वाढदिवस.(Ram Charan Birthday) यानिमित्ताने आम्ही तुम्हाला राम चरण यांच्या आयुष्याशी निगडीत अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. साऊथ सुपरस्टार राम चरणकडे केवळ कोट्यवधींची संपत्ती आहे असं नाही तर घड्याळापासून कारपर्यंत अनेकांच्या किंमती कोट्यवधीच्या घरात आहेत. 

RRR सिनेमाच्या या अभिनेत्याकडे सर्वात कमी किंमतीचे घड्याळ आहे तेदेखील लाखो रुपयांचे. Rolex Yatch Master हा मोठा प्रसिद्ध ब्रँड आहे ज्यांचे सर्वात महागडे घड्याळ राम चरण घालतो. दुसऱ्या घड्याळाच्या तुलनेत हे घड्याळ स्वस्त मानले जाते कारण त्याची किंमत १३ लाख आहे. १८ कॅरेट गोल्डने ते बनवण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, राम चरण याची संपत्ती १३०० कोटींच्या आसपास आहे. ज्यात आलिशान बंगला, कार, महागडी घड्याळे, कपडे यांचा समावेश आहे. 

जर घड्याळाची चर्चा झाली तर राम चरण याला घड्याळांचा शौक आहे. त्याच्याकडे ३० पेक्षा अधिक घड्याळे आहेत. त्यात Richard Mile ब्रँडचा RM 61-01 Yohan Blake आहे. ज्याची किंमत जवळपास ३० मिलियन आहे. हे घड्याळ वॉटर रेजिस्टेंस आहे. राम चरण यांच्याकडे Richard Mile ब्रँडचे आणखी एक घड्याळ आहे ज्याची खास डिझाईन बनवण्यात आली आहे. या ब्रँडची घड्याळे खूप महाग असतात. ज्याला सेलिब्रिटी, खेळाडू तसेच उद्योगपती घालणे पसंत करतात. 

Richard Mile RM029 ची किंमत ८५ लाखाच्या आसपास आहे. जे टॅक्ससह १.५० कोटीपर्यंत खरेदी केले जाऊ शकते. राम चरण यांच्या कलेक्शनमध्ये Patek Philippe Nautilus घड्याळांचाही समावेश आहे. अभिनेता किंवा मॉडेल हे घड्याळ घालतात. राम चरण याच्याकडे त्याचे गोल्ड एडिशन आहे ज्याची किंमत कोट्यवधी आहे. या घड्याळाची किंमत १.२५ कोटी इतकी आहे. 
 

Web Title: Check Out Superstar Ram Charan's Watch Price; You can buy at least 8 houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.