चाळीत जन्माला आल्याचा अभिमानच वाटतो !

By Admin | Updated: August 31, 2014 01:42 IST2014-08-31T01:42:38+5:302014-08-31T01:42:38+5:30

राजकमल कलामंदिरच्या चाळीत मी राहिलो. चाळीत राहून बरेच जण मोठे होतात, हे मान्य आहे आपल्याला. पण मी माङया पद्धतीने मोठा झालो, माङो करिअर घडवले.

Chawla is proud to be born! | चाळीत जन्माला आल्याचा अभिमानच वाटतो !

चाळीत जन्माला आल्याचा अभिमानच वाटतो !

राजकमल कलामंदिरच्या चाळीत मी राहिलो. चाळीत राहून बरेच जण मोठे होतात, हे मान्य आहे आपल्याला. पण मी माङया पद्धतीने मोठा झालो, माङो करिअर घडवले. पण चाळीतली एक शिकवण महत्त्वाची आहे, जी आपण आयुष्यात विसरू शकत नाही, ती म्हणजे शेजारपणाची! चाळ संस्कृतीत शेजारधर्म हा मोठा असतो. चाळीत माणुसकी जपली जाते. आज मला अभिमान वाटतो, की बरं झालं मी चाळीत जन्माला आलो. आज मी देश-परदेशात कुठेही गेल्यावर चाळीच्या अनुभवामुळे मला तिथे माणसांत राहायला जास्त आवडतं. पटकन ओळख करून घ्यायला, मिक्स व्हायला आवडतं. माणुसकी जपत सहज मिक्स होणं ही चाळीतल्या लोकांची खासियतच असते. 
     चाळीमुळे मी कायम ओपन राहिलो. मी जर रिझव्र्ह राहिलो असतो, तर माझा घोळ झाला असता. माङयात हा रिझव्र्हपणा आयुष्यात येणार नाही, कारण मी चाळीत राहिलो आहे. इथे अनेक खाचखळगे पाहिल्याने मी कुणासोबतही ओपनली बोलू शकतो. कसले दडपण मला येत नाही. मी चाळीतून आल्याचा कुठलाही न्यूनगंड मला नाही़ उलट मला अभिमान आहे, की बरं झालं, मी त्या पोङिाशनमधून आलो. कारण त्यामुळेच सर्वत्न वावरताना समोरच्याशी कसं बोलायचं, कसं राहायचं हे कळलं. 
  चाळीत राहूनच माणुसकी कळली. त्याचा कलावंत म्हणून मला उपयोग झाला. चाळीतले अनेक नमुने विविध भूमिकांतून वापरले. माङो बहुतेक रोल हे कॉमन माणसांचेच असतात. सर्वसामान्य माणसाच्याच व्यक्तिरेखा मी उभ्या करतो. हे करताना माङयासाठी चाळीतले अनुभव खूप महत्त्वाचे ठरतात.
 
सगळ्य़ात महत्त्वाचे म्हणजे चाळीने मला प्रेम करायला शिकवले. एकात्मता काय असते हेही अनुभवले. जेव्हा मी नाटकाचा प्रयोग किंवा चित्नपटाचे शूटिंग करत असतो, तेव्हा मी माङया व्हॅंनिटीमध्ये एकटा कधीच बसत नाही. पूर्ण युनिटला घेऊन मी गप्पा मारायला किंवा जेवायला बसतो. हे सर्व चाळीतूनच आलेले आहे. 
 

 

Web Title: Chawla is proud to be born!