कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 08:56 IST2025-07-06T08:55:12+5:302025-07-06T08:56:23+5:30
'या' अभिनेत्याला पाहून प्रेक्षकही अवाक, प्रोमो पाहिलात का?

कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
Chala Hawa Yeu Dya New Show: गेल्या काही दिवसांपासून 'चला हवा येऊ द्या' च्या नव्या पर्वाची चर्चा होती. आता अखेर याचा प्रोमो समोर आला आहे. अभिजीत खांडकेकर, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, ओंकार मोरे, कुशल बद्रिके हे प्रोमोत दिसले. तसंच आणखी एक सरप्राईज म्हणजे अभिनेता प्रियदर्शन जाधवही प्रोमोमध्ये दिसत आहे. या हरहुन्नरी कलाकारांची भट्टी जमली असून 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वासाठी ते सज्ज झाले आहेत.
श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतात. अभिजीत खांडकेकर प्रत्येकाकडे जाऊन यावेळी अख्ख्या महाराष्ट्राने सुपारी दिलीये, कॉमेडीचा डॉन होण्यासाठी महाराष्ट्रभर ऑडिशन सुरु आहेत असं सांगतो. कॉमेडीचा डॉन कोण होणार? असं तो विचारतो आणि लाल सूट बूट, वाढलेली दाढी या लूकमधला प्रियदर्शन जाधव दिसतो. 'फक्त आपण' असं हात वर करुन तो म्हणतो. नंतर सगळे आपण, आपण...म्हणत भांडायला लागतात. अशी ही कॉमेडी गँग तयार झाली आहे. आता हे गँगवॉर पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. २६ जुलै पासून शनिवार-रविवार रात्री साडे नऊ वाजता 'चला हवा येऊ द्या'चं नवीन पर्व धुमाकूळ घालणार आहे.
नव्या कलाकारांना संधी
'चला हवा ये द्या' च्या पहिल्या पर्वाने १० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. हा शो महाराष्ट्रातला नंबर वन शो बनला होता. मात्र शेवटच्या वर्षी टीआरपीच्या कारणामुळे शो बंद झाला. आता नव्या पर्वात निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे ही मंडळी दिसणार नाहीयेत. तर महाराष्ट्राभर ऑडिशन घेऊन त्यातून निवडलेल्या नवख्या कलाकारांना यावेळी संधी देण्यात आली आहे.