"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 11:27 IST2025-07-27T11:26:50+5:302025-07-27T11:27:13+5:30
'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या भागानंतर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. निलेश साबळे, भाऊ कदम आणि सागर कारंडेला मिस केल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं आहे.

"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
'चला हवा येऊ द्या'चं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. शनिवारी(२६ जुलै) 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचा पहिला भाग प्रसारित झाला. पुन्हा प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम भेटीला आल्याने या पर्वासाठी चाहतेही उत्सुक होते. पण या नवीन पर्वात 'चला हवा येऊ द्या'मधले काही जुने चेहरे नाहीत. या चेहऱ्यांना प्रेक्षक मिस करत आहेत. 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या भागानंतर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या भागानंतर झी मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवरुन "हा एपिसोड कसा वाटला?" असं विचारण्यात आलं होतं. त्यावर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. निलेश साबळे, भाऊ कदम आणि सागर कारंडेला मिस केल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं आहे.
"निलेश साबळे भाऊ कदम सागर कारंडे यांना खूप मिस केलं", "भाऊ कदम आणि सागर कारंडे खूप मिस केले"
"पहिल्यासारखी मजा नाही. पण गौरव भाव खाऊन गेला. बाकी कलाकार नेहमीप्रमाणेच मस्त" असं काहींनी म्हटलं आहे.
"भाऊ कदम शिवाय मजा नाही", अशा कमेंटही केल्या आहेत.
'चला हवा येऊ द्या'च्या या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन अभिजीत खांडकेकर करत आहे. निलेश साबळेसोबत भाऊ कदमनेही या नव्या पर्वातून एक्झिट घेतली आहे. या पर्वात गौरव मोरे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे हे कलाकार असून यांच्यात कॉमेडीचं गँगवार पाहायला मिळणार आहे.