ब्रॅड पिट व अँजेलिना जोली यांचे शुभमंगल

By Admin | Updated: August 29, 2014 09:12 IST2014-08-29T09:09:25+5:302014-08-29T09:12:38+5:30

हॉलिवूडचे बहुचर्चित कपल अभिनेता ब्रॅड पिट व अभिनेत्री अँजलिना जोली अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. ९ वर्षे एकत्र राहिल्यावर अखेर दोघेही शनिवारी फ्रान्समध्ये विवाहबद्ध झाले.

Brad Pitt and Angelina Jolie's Shubhamangal | ब्रॅड पिट व अँजेलिना जोली यांचे शुभमंगल

ब्रॅड पिट व अँजेलिना जोली यांचे शुभमंगल

 ब्रॅड पिट व अँजेलिना जोली यांचे शुभमंगल

ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. २९ - हॉलिवूडचे बहुचर्चित कपल अभिनेता ब्रॅड पिट व अभिनेत्री अँजलिना जोली अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. ९ वर्षे एकत्र राहिल्यावर अखेर दोघेही शनिवारी फ्रान्समध्ये विवाहबद्ध झाले. त्यांच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला. या लग्नात त्यांचे कुटुंबिय आणि जवळचे मित्र सहभागी झाल्याचे समजते.
पिट व जोली यांनी प्रथम कॅलिफोर्निया येथून जजकडन लग्नाचे प्रमाणपत्र घेतले व त्यानंतर फ्रान्समधील शानदार विवाहसोहळ्यात ते लग्नगाठीत अडकले. या सोहळ्यास त्यांची सहा मुलेही उपस्थित होती.
मि. अँड मिसेस.स्मिथ चित्रपटादरम्यान या दोघांची ओळख झाली व त्याचे प्रेमात रुपांतर झाले. 
ब्रॅड पिटचे हे दुसरे लग्न असून यापूर्वी त्याने २००० साली अभिनेत्री जेनिफर अ‍ॅनिस्टशनी लग्न केले होते, मात्र २००५ साली ते विभक्त झाले. तर अँजलिना जोलीचे हे तिसरे लग्न आहे. 

Web Title: Brad Pitt and Angelina Jolie's Shubhamangal