‘बॉयफ्रेंड फिल्मों की तरह होते हैं’
By Admin | Updated: October 20, 2016 02:30 IST2016-10-20T02:30:12+5:302016-10-20T02:30:12+5:30
बहुप्रतीक्षित ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटाचा पहिला डायलॉग प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘बॉयफ्रेंड फिल्मों की तरह होते हैं’
बहुप्रतीक्षित ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटाचा पहिला डायलॉग प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर तुमच्या ओठी हसू उमलल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा परस्परांशी संवाद साधताना दिसतात. ‘बॉयफ्रेन्ड ना फिल्मों की तरह होते है, कुछ टाइमपास, कुछ ब्लॉकबस्टर्स...’,‘मदर तो इंडिया होती है, तुम्हारी तो मिल्खा निकली...’ असे यातील विनोदी संवाद तुम्हाला खळखळून हसवतील. शिवाय या चित्रपटाबद्दलची तुमची उत्सुकताही वाढवतील. या प्रोमोमध्ये अनुष्का आणि रणबीरची केमिस्ट्री
चांगलीच जमून आल्याचे दिसते आहे. अर्थात, ऐश्वर्या यातून गायब आहे. आता ऐश्वर्याशिवाय हा प्रोमो तुमच्या मनाला किती भावतो, ते बघा तर!!