बॉलीवूडकरांचा हॉलीवूडमध्येही जलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2016 03:21 IST2016-02-15T03:21:16+5:302016-02-15T03:21:16+5:30

बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या हॉलीवूडमध्ये चांगलीच चर्चेत आहे. अमेरिकन टीव्हीवरील ‘क्वांटिको’ या मालिकेतील भूमिकेसाठी ‘पीपल्स चॉइस’ पुरस्कार पटकावलेल्या प्रियांकाला

Bollywood's flames also come in Hollywood | बॉलीवूडकरांचा हॉलीवूडमध्येही जलवा

बॉलीवूडकरांचा हॉलीवूडमध्येही जलवा

बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या हॉलीवूडमध्ये चांगलीच चर्चेत आहे. अमेरिकन टीव्हीवरील ‘क्वांटिको’ या मालिकेतील भूमिकेसाठी ‘पीपल्स चॉइस’ पुरस्कार पटकावलेल्या प्रियांकाला ८८ व्या आॅस्कर पुरस्काराच्या समारोहासाठी देखील विशेष आमंत्रितांमध्ये स्थान देण्यात आले आहे. भारतीयांसाठी ही बाब नक्कीच अभिमानास्पद असून, प्रियांकाला सातासमुद्रापार मिळत असलेल्या अफाट लोकप्रियतेचे बॉलीवूडकरांकडून देखील विशेष कौतुक केले जात आहे. बॉलीवूडबरोबरच हॉलीवूडमध्येही दबदबा निर्माण करणाऱ्या अशाच काही कलाकारांची ही विशेष ओळख...
दीपिका पदुकोन
प्रियांकापाठोपाठ आता दीपिकानेदेखील ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झेंडर कैज’ या अ‍ॅक्शन मूव्हीच्या माध्यमातून हॉलीवूडमध्ये एन्ट्री केली आहे. वीन डिझेलसोबतचे तिचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. दीपिकाही बॉलीवूडप्रमाणेच हॉलीवूडमध्येही मोठी पारी खेळेल, असा विश्वास तिचे चाहते व्यक्त करीत आहेत.
फ्रीडा पिंटो
स्लमडॉग मिलेनियर या आॅस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटाने आणखी एका अभिनेत्रीला हॉलीवूडचे दरवाजे उघडून दिले. स्लमडॉग मिलेनियरमध्ये झळकलेल्या फ्रीडा पिंटोने अनेक हॉलीवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. ‘डेजर्ट डांसर, इमोर्टल्स’ या चित्रपटांमधील तिच्या भूमिका विशेष गाजल्या. शिवाय तिने हॉलीवूडच्या अनेक नामांकित पुरस्कार सोहळ्यांमध्येदेखील हजेरी लावली आहे.
इरफान खान
‘लाइफ आॅफ पाई, स्लमडॉग मिलेनियर आणि जुरासिक वर्ल्ड’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या इरफान खानचा हॉलीवूडमध्ये चांगलाच दबदबा आहे. येथे त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली असून, अजूनही त्याला हॉलीवूडपटाच्या बऱ्याचशा आॅफर्स येत आहेत. अनिल कपूर
इरफानबरोबरच स्लमडॉग मिलेनियरमध्ये प्रमुख भूमिका साकारलेल्या अनिल कपूरचे देखील हॉलीवूडमध्ये विशेष वलय आहे. ‘मिशन इम्पॉसिबल’ या अ‍ॅक्शनपटात अनिलने भूमिका साकारली आहे. शिवाय आगामी काळातदेखील तो हॉलीवूडच्या काही चित्रपटांमध्ये झळकण्याची शक्यता आहे.

Web Title: Bollywood's flames also come in Hollywood