नीना गुप्ताने केले ‘झुला आसन’; इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडीओ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 17:19 IST2020-04-19T17:19:24+5:302020-04-19T17:19:52+5:30

नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ती झूला आसन करताना दिसतेय. यात ती पदमासनामध्ये बसलेली आहे.

 'Zula Asan' by Nina Gupta; Video shared on Instagram! | नीना गुप्ताने केले ‘झुला आसन’; इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडीओ!

नीना गुप्ताने केले ‘झुला आसन’; इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडीओ!

सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने सर्व सेलिब्रिटी घरातच टाइमपास करत वेळ घालवत आहेत. तसेच स्वत:चे छंद देखील ते जोपासताना दिसत आहेत. कुणी पेंटिंग तर कुणी कुकिंग करत हा लॉकडाऊनचा काळ एन्जॉय करताना दिसत आहेत. आता हेच बघा ना, नीना गुप्ताही यात मागे नाही. तिने देखील प्राणायामातील एक प्रकार असलेला ‘झुला आसन’ करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला बरेच लाईक्स मिळत आहेत. तसेच तिने पिज्झा करतानाचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

‘बधाई हो’ चित्रपटामध्ये आयुष्मान खुराणाच्या आईची भूमिका साकारणारी नीना गुप्ता ही आजच्या अभिनेत्रींच्या तुलनेत कुठेच मागे नाही. नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ती झूला आसन करताना दिसतेय. यात ती पदमासनामध्ये बसलेली आहे. दोन हातांवर तिने संपूर्ण शरीराचे वजन उचलले असून त्यात तिने झोका घेतलेला दिसत आहे. हा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये दिसत आहे. पांढऱ्या  रंगाच्या ड्रेसमध्ये ती बसलेली दिसत आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांचे लाइक्स मिळताना दिसत आहे.

नीना गुप्ता हिने अजून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती पिज्झा कसा करायचा? ते सांगत आहे. ५१ मिनिटांच्या या व्हिडीओत ती पिज्झाची रेसिपी सांगतेय. सर्व सामग्री एकत्र करून देसी पिज्झा कसा करायचा ते तिने अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितले आहे. 

Web Title:  'Zula Asan' by Nina Gupta; Video shared on Instagram!