झोया अख्तर आणि रीमा कागती यांच्या 'टाइगर बेबी फिल्म्स'चे 'द गली ग्रोव चॅलेंज'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 07:08 PM2021-06-30T19:08:34+5:302021-06-30T19:09:17+5:30

चाहत्यांनी सादर करायचा आहे अपना टाईम आयेगावर ३० सेकंदांचा रील व्हिडिओ

Zoya Akhtar and Reema Kagti's 'Tiger Baby Films' 'The Alley Grove Challenge' | झोया अख्तर आणि रीमा कागती यांच्या 'टाइगर बेबी फिल्म्स'चे 'द गली ग्रोव चॅलेंज'

झोया अख्तर आणि रीमा कागती यांच्या 'टाइगर बेबी फिल्म्स'चे 'द गली ग्रोव चॅलेंज'

googlenewsNext

२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या, जोया अख्तर आणि रीमा कागतीद्वारे लिखित 'गली बॉय'ने केवळ बॉक्स ऑफिसवरचेच सगळे रिकॉर्ड तोडले नाहीत तर प्रेक्षकांच्या मनात देखील आपले स्पेशल स्थान बनवण्यात यश मिळवले. चित्रपटाने हिंदी हिप-हॉप संगीताचा मार्ग प्रशस्त करत अनेक अंडरग्राउंड कलाकारांना लाईम लाइटमध्ये आणले. 

आज, जोया अख्तर, रीमा कागती यांच्या 'टाइगर बेबी फिल्म्स'ने सोशल मीडियावर 'द गली ग्रोव चैलेंज'ची सुरुवात केली असून ज्यामध्ये प्रेक्षकांना स्वत:ला सृजनात्मक रूपात सादर करण्याची संधी मिळणार आहे.  त्यांनी चित्रपटातील सुपरहिट गाणे 'अपना टाइम आएगा'वर ३० सेकंदांचा रील व्हिडीओ बनवून सादर करायचा आहे. यामध्ये आपल्या कल्पनाशक्तीला चालना देत ते रॅपिंग, डांस, रनिंग, ड्राइविंग, कुकिंग या कशावरही त्यांना हा रील व्हिडीओ तयार करता येईल.  


याविषयी बोलताना झोया म्हणाली की, "सोशल मीडियाची ताकद अभूतपूर्व आहे. यामुळे मी वैयक्तिक आणि दैवीरूपाने जोडले गेले आहे आणि मला आशा आहे की आता हा ध्वनी मला तुमच्याशी जोडू शकेल. गली ग्रूव चैलेंजसोबत संगीत आणि व्यक्तिमत्व सादर होणार आहे, तेव्हा तुम्ही काय सादर करणार आहात हे पाहण्याची मला प्रचंड उत्सुकता आहे."  लिमिटेड एडिशन गली बॉय व्हीनाईल, ज्यावर जोया अख्तर आणि रीमा कागती यांच्या स्वाक्षऱ्या असलेला मॅसेज असेल, टॉप १० रील्सना देण्यात येईल!

झोया अख्तरने रणवीर सिंग आणि आलिया भट अभिनीत गली बॉयचे दिग्दर्शन केले होते. चित्रपटाला ब्युशीयन इंटरनेशनल फैंटास्टिक फिल्म फेस्टिवल (BIFAN) मध्ये सर्वश्रेष्ठ आशियाई चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. २०१९ ला NETPAC सर्वश्रेष्ठ आशियाई चित्रपट आणि अशाच काही अन्य पुरस्कारांनी देखील सम्मानित करण्यात आले होते.

Web Title: Zoya Akhtar and Reema Kagti's 'Tiger Baby Films' 'The Alley Grove Challenge'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.