युवराज-हेजलच्या रिसेप्शनचा दिमाखदार सोहळा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 13:29 IST2016-12-08T13:12:07+5:302016-12-08T13:29:24+5:30
सर्वत्र रोषणाई, झगमगणारे हिरव्या-निळ्या रंगाचे दिवे, आकर्षक सजावट, प्रतिष्ठीत व्यक्तींची उपस्थिती, मित्रमंडळींची धम्माल मस्ती असे काहीसे वातावरण युवराज सिंग-हेजल ...
.jpg)
युवराज-हेजलच्या रिसेप्शनचा दिमाखदार सोहळा!
स ्वत्र रोषणाई, झगमगणारे हिरव्या-निळ्या रंगाचे दिवे, आकर्षक सजावट, प्रतिष्ठीत व्यक्तींची उपस्थिती, मित्रमंडळींची धम्माल मस्ती असे काहीसे वातावरण युवराज सिंग-हेजल कीच या नवदाम्पत्याच्या दिल्लीतील रिसेप्शनवेळी होते. त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचा दिमाखदार सोहळा काल पार पडला. रिसेप्शनसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती.
![]()
![]()
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेले युवी आणि हेजल कसे दिसत असतील? याची सर्वांना उत्सुकता लागली होती. उपस्थित सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचल्यानंतर या नवदाम्पत्याने एन्ट्री केली. यावेळी युवीने लाल रंगाचा कुर्ता-पायजमा घातलेला तर हेजल कीचने निळ्या-लाल रंगाच्या रंगसंगतीतील घागरा घातला होता. उपस्थित सर्वांची नजर त्यांच्यावर खिळून असतांनाच ते दोघे एकमेकांसाठी ‘मेड फॉर इच अदर’ दिसत होते, अशा प्रतिक्रिया उपस्थितांमधून येत होत्या. या सोहळयामधील काही फोटो नुकतेच व्हायरल झाले आहेत.
![]()
![]()
चंदीगढ येथे शीख पद्धतीने तर गोव्यात हिंदू पद्धतीने युवी-हेजलच्या लग्नाचे विधी पार पडले. गेल्या सहा महिन्यांपासून युवराज-हेजल यांचे लग्न चर्चेत होते. लग्नाच्या बाबतीतील उत्सुकता सोशल मीडियावर ते फोटो शेअर करून व्यक्त करत होते. त्यांच्या चाहत्यांना मात्र लग्नानंतर प्रतीक्षा लागली होती ती त्यांच्या ग्रँड रिसेप्शन पार्टीची. समाजातील बहुप्रतिष्ठित, मित्रमंडळी, आप्तस्वकीय यांची उपस्थिती या पार्टीला लाभली होती. त्यात भारतीय क्रिकेट टीममधील महेंद्रसिंग धोनी, विरेंदर सेहवाग, सौरव गांगुली, कपिल देव आणि जहीर खान या खेळाडूंनी सपत्निक हजेरी लावली होती. त्याचबरोबर राजकीय वर्तुळातील नेते राहुल गांधी आणि अरूण जेटली यांनीही येथे उपस्थिती नोंदवली.