युवराज आणि हेजलच्या नात्यात आला दुरावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 17:03 IST2018-04-03T11:33:45+5:302018-04-03T17:03:45+5:30

गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेजल कीच यांच्यात खटके उडत असल्याची चर्चा आहे. रिपोर्टच्यानुसार दोघांच्या ...

Yuvraj and Hajal's relationship duraava? | युवराज आणि हेजलच्या नात्यात आला दुरावा?

युवराज आणि हेजलच्या नात्यात आला दुरावा?

ल्या काही दिवसांपासून क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेजल कीच यांच्यात खटके उडत असल्याची चर्चा आहे. रिपोर्टच्यानुसार दोघांच्या वैवाहिक आयुष्यात काही तरी खटकले असल्याची चर्चा आहे.  

अभिनेत्री हेजल किचने सोशल मीडियावर यागोष्टीवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. हेजलने नुकतेच आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये ती युवराज आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत लाँग ड्राईव्हला जाते आहे. या फॅमिली आऊटिंगचे फोटो शेअर करताना तिने एक कॅप्शन सुद्धा दिले आहे. हेजलने लिहिले, फॅमिलीसोबत स्पेंट केलेला वेळ हा सगळ्यात खास, आनंदी आणि सुंदर असतो. मिड डेच्या रिपोर्टनुसार हेजलने युवराजसोबत सुरु असलेल्या खटक्यांच्या बातम्यांचे खंडन करण्यासाठी हा फोटो शेअर केला आहे. 

युवराज आणि हेजलची ओळख एक कॉमन फ्रेंडच्यामुळे झाली होती. दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 12 नोव्हेंबर 2015 दोघांनी बालीमध्ये साखरपुडा उरकला होता. त्यानंतर  30 नोव्हेंबर 2016 ला दोघे विवाह बंधनात अडकले. दोघांनी पंजाबी रितीरिवाज प्रमाणे फतेहगड स्थित गुरुद्वारमध्ये विवाह केला आहे. त्यानंतर त्यांनी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केले होते. दिल्लीतदेखील त्यांनी ग्रँड रिसेप्शन पार्टी दिली. त्यांच्या लग्नसोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आणि क्रिकेटरने हजेरी लावली होती. महेंद्रसिंग धोनी, विरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, कपिल देव आणि जहीर खान या खेळाडूंनी सपत्निक हजेरी लावली होती. त्याचबरोबर राजकीय वर्तुळातील नेते राहुल गांधी आणि अरूण जेटली यांनीही येथे उपस्थिती नोंदवली. 

युवराजचे हेजलच्या आधी अनेक अभिनेत्रींशी नाव जोडण्यात आले होते. मोहोब्बते या चित्रपटातील किम शर्मासोबत युवराजचे अनेक वर्षं अफेअर होते. तसेच प्रिती झिंटा, दीपिका पादुकोण, रिया सेन, मिनिषा लांबा या अभिनेत्रींसोबतही त्याचे प्रेमसंबंध असल्याचे म्हटले जाते. 

Web Title: Yuvraj and Hajal's relationship duraava?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.