युलियामुळे ‘ सलमान’चे लंगोट विक्रीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 12:17 IST2016-06-25T06:47:45+5:302016-06-25T12:17:45+5:30

वाचून हैराण झालात? आहो फिल्म प्रोमोशनसाठी निर्माते कोणकोणते फंडे वापरतील हे सांगता येत नाही. हॉलीवूडमध्ये चित्रपटातील काही गोष्टी मर्चंडाईज ...

Yuliya sold Salman's diapers because of it | युलियामुळे ‘ सलमान’चे लंगोट विक्रीला

युलियामुळे ‘ सलमान’चे लंगोट विक्रीला

चून हैराण झालात? आहो फिल्म प्रोमोशनसाठी निर्माते कोणकोणते फंडे वापरतील हे सांगता येत नाही.

हॉलीवूडमध्ये चित्रपटातील काही गोष्टी मर्चंडाईज म्हणून विकतात. एक तर त्यातून चित्रपटाला प्रसिद्धीही मिळते आणि ‘एक्स्ट्रा’ कमाईदेखील होते.

हाच फंडा ‘सुल्तान’साठी वापरण्यात येणार आहे. फिल्ममध्ये सलमान खानने जी पहिलवानाची लंगोट घातली आहे तशा लंगोट बाजारात विक्री करण्याचा  निर्मात्यांनी  निर्णय घेतला आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे सलमानला अशा प्रकारे लंगोट विकणे मुळीच आवडलेले नाही. शुटिंग दरम्यान त्याच्या लंगोट घातलेला फोटो जेव्हा लीक झाला होता तेव्हा तो खूप चिडला होता.

मग त्याने परावानगी कशी दिली? याचे कारण आहे तथाकथित सल्लूमियांची ‘गर्लफे्रें ड’ युलिया वंटूर. तिनेच सलमानला राजी केले. आता दुकानात गेल्यावर कोणी ‘सुल्तान लंगोट द्या’ असे म्हटल्यावर तुम्ही आश्चर्य नका वाटू देऊ.

अधिक वाचा :

लंगोटबद्दल काय बोलला सलमान

आमीर म्हणाला, ‘लंगोट’ मध्ये सल्लूमियाँ दिसतो जास्त हॉट

Web Title: Yuliya sold Salman's diapers because of it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.