​सलमान खानसोबतच्या रिलेशनशिपवर अखेर बोलली युलिया वेंंटर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 11:51 IST2017-04-05T06:21:05+5:302017-04-05T11:51:05+5:30

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान आणि रोमानियन ब्युटी युलिया वेंटर यांच्यात नेमके सुरु आहे तरी काय? हा प्रश्न अद्यापही ...

Yulia Venture speaks on the relationship with Salman Khan | ​सलमान खानसोबतच्या रिलेशनशिपवर अखेर बोलली युलिया वेंंटर!!

​सलमान खानसोबतच्या रिलेशनशिपवर अखेर बोलली युलिया वेंंटर!!

लिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान आणि रोमानियन ब्युटी युलिया वेंटर यांच्यात नेमके सुरु आहे तरी काय? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. दोघांचेही ब्रेकअप झाल्याच्या बातम्या असताना अचानक हे दोघे एकत्र दिसतात आणि मग पुन्हा चर्चेचा बाजार गरम!  अद्यापही सलमान वा युलिया या दोघांनी आपले नाते जाहिर केलेले नाही. खरे तर अलीकडे दोघेही संपूर्ण कुटुंबासोबत मालदीव येथे हॉली डे एन्जॉय करताना दिसले. पण तरिही दोघेही रिलेशनशिपवर बोलायला तयार नाहीत. युलिया अतिशय खुल्या विचारांची व बोल्ड असूनही सलमानबद्दल ती गप्प आहे. पण शेवटी मनातल्या भावना कुठपर्यंत लपवणार. अखेर युलिया बोललीच. होय, सलमानसोबतच्या रिलेशनशिपबद्दल बोलली.


ALSO READ : २२ तासांचा प्रवास करून अहिलच्या वाढदिवसाला पोहोचला सलमान खान!

एका मुलाखतीत, सलमानसोबतच्या रिलेशनशिपबद्दल तिला विचारण्यात आले. यावर ती काय म्हणाली माहितीय? आधी हे माझे पर्सनल मॅटर असल्याचे सांगितले. पण नंतर ती बोलली. हा माझा खासगी मामला आहे. पण तुम्ही विचारताय म्हटल्यावर त्यामागची उत्सूकता मी समजू शकते. सगळे जण आपआपले काम करताहेत. अनेकदा हवेतच इमले बांधले जातात, असे ती म्हणाली. केवळ एवढेच बोलून ती थांबली नाही. तर पुढे ती म्हणाली, एखादी गोष्ट तुम्हाला कधी आणि कशी मिळणार आहे, हे तुम्हाला माहित नसते. हेच जीवनाचे सौंदर्य आहे. खान कुटुंब अतिशय सुंदर आहे. मी त्यांचा अतिशय आदर करते. त्यांचे एकमेकांशी बॉन्डिंग जबरदस्त आहे. त्यांच्या घराचे दरवाजे सगळ्यांसाठी सतत उघडे असतात.
एकंदर काय, तर युलिया याहीवेळी स्पष्ट बोलली नाही. पण जे काही बोलली त्यावरून तिच्या मनात सलमान कुठेतरी आहे, हे मात्र नक्की कळतेय.

Web Title: Yulia Venture speaks on the relationship with Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.