युलिया वेंटुरने केला सलमान खानच्या ‘या’ गाण्यावर डान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 19:05 IST2017-01-22T13:35:35+5:302017-01-22T19:05:35+5:30

‘बॉलिवूडचा दबंग’ सलमान खान हा त्याची रोमानियन गर्लफ्रेंड-मॉडेल युलिया वेंटुर हिच्यासोबत अजूनही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. सल्लूमियाँने जरी हे ...

Yuleya Ventur made dance to Salman Khan's 'This' song! | युलिया वेंटुरने केला सलमान खानच्या ‘या’ गाण्यावर डान्स!

युलिया वेंटुरने केला सलमान खानच्या ‘या’ गाण्यावर डान्स!

ॉलिवूडचा दबंग’ सलमान खान हा त्याची रोमानियन गर्लफ्रेंड-मॉडेल युलिया वेंटुर हिच्यासोबत अजूनही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. सल्लूमियाँने जरी हे सार्वजनिकरित्या मान्य केले नसले तरीही आपल्याला खरे काय ते ठाऊक आहे. नाही का? युलियाचे सलमानवर एवढे प्रेम आहे की, तिला अलीकडेच एका कार्यक्रमाची आॅफर आली तेव्हा तिने चक्क ‘सुल्तान’ चित्रपटातील ‘बेबी को बेस पसंद हैं’ या गाण्यावर परफॉर्मन्स करण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमात परफॉर्म करायला मिळणार म्हणून युलिया अत्यंत खुश होती. या कार्यक्रमासाठी तिने दिवसांतील अनेक तास रिहर्सल केली. या गाण्यावर तिने धमाकेदार डान्स परफॉर्मन्स सादर केला. तिला या कार्यक्रमात मिळालेला प्रतिसाद पाहता सर्वांना तिचा डान्स आवडल्याचे कळतेय. तिने सलमानसोबतच खान कुटुंबियांचेही मन जिंकले असल्याचे कळतेय. 

                             

युलिया वेंटुर ही सलमान खानची पत्नी आणि खान कुटुंबियांची सुन होण्यास उत्सुक आहे. मात्र, भाईचा सध्या लग्न करण्याचा विचार दिसत नाहीये. सलमान आणि युलिया हे दोघेही फॅमिली गेट टुगेदरमध्ये अनेकदा एकत्र आलेले दिसले. युलियाला आपण भाईच्या कुटुंबियांची अत्यंत मनापासून काळजी घेतांना पाहिले. सल्लूमियाँची बहीण अर्पिता खान हिला मुलगा झाला त्यावेळी सर्वजण तिला पाहायला जात असताना युलिया त्याच्या आईचा हात हातात घेऊन जाताना आपण पाहिलं आहे. भाईजानचे चाहते तर त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, सल्लूमियाँच्या मनात लग्नाचा विचार केव्हा येतो? तेच कळत नाही. 

Web Title: Yuleya Ventur made dance to Salman Khan's 'This' song!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.