कलाकारांच्या ‘या’ विचित्र मागण्या ऐकून तुम्ही व्हाल चकित!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 18:54 IST2017-05-03T13:24:56+5:302017-05-03T18:54:56+5:30
अबोली कुलकर्णी ग्लॅमरस जग, सेलिब्रिटींची लाईफस्टाईल, आवडीनिवडी यांचे आपल्याला नेहमीच आकर्षण असते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यावेसे वाटते. त्यांचा ...

कलाकारांच्या ‘या’ विचित्र मागण्या ऐकून तुम्ही व्हाल चकित!
ग्लॅमरस जग, सेलिब्रिटींची लाईफस्टाईल, आवडीनिवडी यांचे आपल्याला नेहमीच आकर्षण असते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यावेसे वाटते. त्यांचा थाट, त्यांची व्यवस्थेची आपल्याला साहजिकच भूरळ पडते. चित्रपटाच्या सेटवरही त्यांच्या दिमतीला अनेक लोक असतात. त्यांना काय हवे, काय नको यांची काळजी घेणारी टीमच असते. मात्र, तुम्हाला हे माहितीये का की, कलाकारांची संपूर्ण व्यवस्था करत असताना निर्मात्यांना कलाकारांच्या काही विचित्र मागण्यांचेही भान ठेवावे लागते. कु ठल्या कलाकारांच्या आहेत ‘या’ विचित्र मागण्या पाहूयात...
अक्षय कुमार
‘बॉलिवूडचा खिलाडी’ अक्षय कुमार याला अलीकडेच ‘रूस्तुम’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याचा अभिनय, कामगिरी आणि देशाप्रती असलेले विचार यांच्यामुळे तो इतर कलाकारांपेक्षा वेगळा वाटतो. पण, तुम्हाला माहितीये का, एखादा चित्रपट साईन करत असताना त्याची एक अट असते. ती म्हणजे त्याला रविवारी सुटी हवी असते. त्याला त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवता यावा म्हणून त्याला ही आठवड्याची सुटी आवश्यक वाटते.
हृतिक रोशन
पिळदार शरीरयष्टी, सिक्स पॅक्स अॅब्स अशी बॉडी कुणाची असेल तर पहिले नाव हृतिक रोशन याचेच आठवते. पण, या बॉडीसाठी त्याला खुप मेहनत घ्यावी लागली आहे. त्याचे कारण आहे तो घेत असलेले डाएट, व्यायाम, पॉझिटिव्हिटी. त्याच्या डाएटबद्दल कुठलाही हलगर्जीपणा त्याला चालत नाही. म्हणून तो शूटिंगवेळीही त्याचा स्वत:चा कुक ठेवत असतो. पूर्ण दिवस शूटिंग किंवा सुटी असेल तरीही तो त्याचा कुक सोबत असू देतो. त्याला जेव्हा काय हवे असेल तेव्हा तो कुक त्याला बनवून देत असतो.
कंगना रणौत
‘बॉलिवूडची बिनधास्त गर्ल’ कंगना रणौत हिला ‘तन्नू वेड्स मन्नू’ चित्रपटासाठी दोन वेळेस राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ती जेवढी दिसते तेवढीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात बिनधास्त देखील आहे. शूटिंग करत असताना तिची केवळ एकच अट असते ती म्हणजे ती थेट चित्रपटाच्या टीमसोबत बोलणार नाही. तिची पर्सनल असिस्टंट सर्वांसोबत संवाद साधते. जर एखाद्या व्यक्तीला तिच्यासोबत बोलायचे असेल तर अगोदर तिच्या पर्सनल असिस्टंटसोबत बोलावे लागते. कंगनाऐवजी तीच सर्व प्रश्नांची उत्तरे देते. कंगना नेहमी खात्री करते की, तिची पीए तिच्यासोबत प्रवास करत असेल.
सलमान खान
‘बी टाऊन’चा दबंग स्टार सलमान खान याच्यासोबत काम करायला मिळणंच एखाद्या अभिनेत्रीसाठी खुप मोठी गोष्ट. मात्र, सल्लूमियाँची एक अट कायम असते. ती म्हणजे दिग्दर्शकाने असा एकही सीन ठेवू नये ज्यात तो त्याची सहकलाकार अभिनेत्रीला किस करेल. इंटिमेट सीन्स, लिपलॉक्स करण्याला त्याची ‘ना’ आहे. फॅमिलीसोबत चित्रपट पाहताना विचित्र वाटते म्हणून त्याने ही अट ठेवली आहे. त्याची अजून एक मागणी अशी आहे की, एखाद्या डान्सवर आधारित रिअॅलिटी शोमध्ये सलमान आणि ऐश्वर्या किंवा सलमान आणि शाहरूख खान यांच्यावर चित्रीत गाण्यावर डान्स केला जाऊ नये.
शाहरूख खान
सलमान खान प्रमाणेच शाहरूख खानचीही अट अशीच आहे, ‘नो किसिंग’. शाहरूख खान हा एक फॅमिली मॅन आहे. त्यामुळे शक्यतो तो या गोष्टी टाळतो. ‘जब तक हैं जान’ मध्ये त्याने त्याची सहकलाकार कॅटरिना कैफला किस केले होते. पण, ती स्क्रिप्टची गरज होती म्हणून तो सीन केल्याचे शाहरूखने अनेक मुलाखतीत सांगितले आहे.
करिना कपूर खान
‘बॉलिवूडची बेबो’ करिना कपूर खान हिची एकच अट आहे ती म्हणजे ती चित्रपट केवळ ‘ए’ लिस्टर्स अभिनेत्यांसोबतच करणार. बी ग्रेड किंवा नवोदित आर्टिस्ट यांच्यासोबत ती काम करणार नाही. शाहिद कपूर आणि हृतिक रोशन यांच्यासोबत ती काही कारणांमुळे काम करत नाही, हे सत्य तर आपल्याला ठाऊक आहेच.
सोनाक्षी सिन्हा
‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा ही तिच्या कामाबद्दल फार चिकित्सक आहे. ती कुठलेही लिपलॉक्स, इंटीमेट सीन्स आणि तोकड्या कपडयांतील सीन्स करणे टाळते. स्क्रिप्टची गरज असताना ती एखादा किस करायला तयार होते. ती तिच्या या वेगळेपणामुळे इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळी वाटते.