बॉबी देओलच्या लग्नाला झाले 25 वर्षं पूर्ण, रोमँटिक फोटो शेअर करत लिहिली खास पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 18:40 IST2021-05-31T18:36:38+5:302021-05-31T18:40:51+5:30

बॉबीने त्याचा आणि त्याची पत्नी तान्याचा एक रोमँटिक फोटो शेअर करत एक खास संदेश लिहिला आहे.

"You Mean The World To Me," Writes Bobby Deol For His Wife Tanya On Wedding Anniversary | बॉबी देओलच्या लग्नाला झाले 25 वर्षं पूर्ण, रोमँटिक फोटो शेअर करत लिहिली खास पोस्ट

बॉबी देओलच्या लग्नाला झाले 25 वर्षं पूर्ण, रोमँटिक फोटो शेअर करत लिहिली खास पोस्ट

ठळक मुद्देबॉबी देओल आणि तान्या १९९६ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांना दोन मुले असून बॉबी अनेकवेळा त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्याच्या फॅमिलीचे फोटो पोस्ट करत असतो.

बॉबी देओल अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असला तरी त्याच्या पत्नीला आपल्याला खूपच कमी वेळा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी त्याच्यासोबत पाहायला मिळते. बॉबीच्या पत्नीचे नाव तान्या असून तिच्या सौंदर्याची नेहमीच तारीफ केली जाते. तान्या ही दिसायला अतिशय सुंदर असून ती एखाद्या अभिनेत्रीइतकीच छान दिसते.

बॉबी आणि तान्या यांच्या लग्नाला काल 25 वर्षं पूर्ण झाले. बॉबीने त्याच्या आणि तान्याचा एक रोमँटिक फोटो शेअर करत एक खास संदेश लिहिला आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, तू माझ्यासाठी जग आहेस.... तुझ्यावर नेहमीच असेच प्रेम करत राहीन... 25 व्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

बॉबी देओल आणि तान्या १९९६ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांना दोन मुले असून बॉबी अनेकवेळा त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्याच्या फॅमिलीचे फोटो पोस्ट करत असतो. बॉबी आणि तान्याची लव्हस्टोरी कुठल्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाहीये. होय, बॉबी अगदी पहिल्याच नजरेत तान्याच्या प्रेमात पडला होता. बॉबी आपल्या मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये बसून चहा पित होता. त्याठिकाणी तान्याही बसलेली होती. बॉबीने जेव्हा तान्याला बघितले तेव्हा पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. पुढे बॉबीने लगेचच तान्याबद्दलची माहिती काढली. काहीच दिवसांत बॉबी आणि तान्या यांच्यात बोलणे सुरू झाले. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठीही व्हायला लागल्या. त्यानंतर एकेदिवशी बॉबी तान्याला त्याच्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला, ज्याठिकाणी त्याने पहिल्यांदा तिला बघितले होते. तिथेच त्याने तिला प्रपोज केले. पुढे दोघांच्या परिवारातील लोक एकमेकांना भेटले आणि लग्नाची बोलणी केली.

बॉबीचे वडील अभिनेते धर्मेंद्र यांना तान्या खूपच पसंत पडली. त्यामुळे त्यांनी लगेचच ‘चट मंगनी, पट ब्याह’ उरकून टाकण्याचा निर्णय घेतला. अशापद्धतीने १९९६ मध्ये तान्या आणि बॉबीने साताजन्माच्या गाठी बांधल्या. तान्या एका मोठ्या उद्योगपती घराण्यातून आहे. त्यांचा खूप मोठा फर्निचर आणि होम डेकोरेशनचा ‘द गुड अर्थ’ या नावाने बिझनेस आहे. तान्या देखील स्वत: एक डिझाईनर आहे.

Web Title: "You Mean The World To Me," Writes Bobby Deol For His Wife Tanya On Wedding Anniversary