तुम्हाला माहिती आहे, 15 वर्षांपूर्वीच रणबीरची पत्नी बनणार होती आलिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 04:22 PM2018-07-06T16:22:35+5:302018-07-06T16:27:46+5:30

सध्या बी टाऊनमध्ये लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या अफेअरची खूप चर्चा आहे.

You know, 15 years ago, Alia was going to be the wife of Ranbir | तुम्हाला माहिती आहे, 15 वर्षांपूर्वीच रणबीरची पत्नी बनणार होती आलिया

तुम्हाला माहिती आहे, 15 वर्षांपूर्वीच रणबीरची पत्नी बनणार होती आलिया

ठळक मुद्देआलिया आणि रणबीर अयान मुखर्जीचा सिनेमा ब्रह्मास्त्रमध्ये एकत्र दिसणार आहेत.

सध्या बी टाऊनमध्ये लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या अफेअरची खूप चर्चा आहे. बॉलिवूडमध्ये तर हे कपल 2020 पर्यंत लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची सुद्धा चर्चा आहे. कदाचित आलिया आणि रणबीरची जोडी आजपासून 15 वर्षांआधीच बनली असती. त्यावेळी आलिया फक्त 11 वर्षांची होती तर रणबीर कपूर 20 वर्षांचा होता. आलियाने त्यादिवसांची आठवण काढत म्हणाली, रणबीर तेव्हा संजय लीला भन्साळी यांना असिस्ट करायचा. मला त्याच्यासोबत एक फोटोशूट करायचे होते. मला त्याच्या खांद्यावर डोकं ठेवायला खूप लजा वाटत होती. खूप वर्षांपूर्वी संजय लीला भन्साळी 1976 मध्ये आलेल्या 'बालिका वधू' सिनेमाचा रिमेक तयार करत होते. या रिमेकसाठी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर याजोडीला कास्ट करण्याची तयारी झाली होती. यासाठी दोघांनी फोटोशूट केले होते. मात्र काही कारणांमुळे पुढे तो प्रोजेक्ट होऊच शकला नाही.    

  
रणबीरने सुद्धा आपल्या इंटरव्हु दरम्यान या फोटोशूटचा उल्लेख केला होता. रणबीर म्हणाला होता, जर त्यावेळी माझा आणि आलियाचा सिनेमा तयार झाला असता तर तो नक्कीच जबरदस्त असता. जवळपास दीड शतकानंतर ही जोडी सिल्वर स्क्रिनवर एकत्र येतेय. दोघे अयान मुखर्जीचा सिनेमा ब्रह्मास्त्रमध्ये एकत्र दिसणार आहेत.'ब्रह्मास्त्र' एक ट्रायोलॉजी चित्रपट आहे. म्हणजे, या चित्रपटाचे एकापाठोपाठ एक असे तीन भाग प्रदर्शित होणार आहेत. याच्या पहिल्या भागाचे शूटींग सुरू आहे. हा चित्रपट 2019च्या 15 आॅगस्टच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  


आलियाने याआधीच अनेक वेळा कबुल केले आहे की तिला रणबीर तिच्या लहानपणीपासूनच आवडतो. मिळालेल्या माहितीनुसार कपूर आणि भट्ट कुटुंबीयांना ही जोडी पसंत आहे. सगळे काही ठीक चालले तर लवकरच हे दोघे विवाहाच्या बेडीत अडकतील.   

Web Title: You know, 15 years ago, Alia was going to be the wife of Ranbir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.