होय, ‘फ्लर्ट’च्या बाबतीत रणबीर कपूर एकदम बेकार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 15:19 IST2017-08-11T09:49:18+5:302017-08-11T15:19:18+5:30

बॉलिवूडचा लव्हर बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता रणबीर कपूर चित्रपटांसोबतच त्याच्या  लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतो. दीपिका पादुकोण आणि कॅटरिना ...

Yes, Ranbir Kapoor is completely useless in 'Flirt' !! | होय, ‘फ्लर्ट’च्या बाबतीत रणबीर कपूर एकदम बेकार!!

होय, ‘फ्लर्ट’च्या बाबतीत रणबीर कपूर एकदम बेकार!!

लिवूडचा लव्हर बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता रणबीर कपूर चित्रपटांसोबतच त्याच्या  लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतो. दीपिका पादुकोण आणि कॅटरिना कैफ यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहुन चुकलेल्या रणबीरची गणना बॉलिवूडच्या ‘फ्लर्टी अ‍ॅक्टर्स’मध्ये होते. पण रणबीरला अगदी जवळून ओळखणारा दिग्दर्शक इम्तियाज अलीचे मानाल तर यात काहीही तथ्य नाही. कारण सत्य काही वेगळेच आहे.



‘रॉकस्टार’ व ‘तमाशा’ या चित्रपटांत  रणबीरला डायरेक्ट करणारा इम्तियाज अलीकडे नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये आला होता. यावेळी बोलताना इम्तियाजने रणबीरच्या ‘फ्लर्टी’ इमेजबद्दल एक धक्कादायक खुलासा केला. या शोमध्ये रणबीर ‘फ्लर्टी’ असण्याबाबत विषय निघाला. मग काय, असे अजिबात नाही, असा दावा इम्तियाजने केला. रणबीरची ‘फ्लर्टी इमेज’ एक ‘Disaster’ असल्याचे इम्तियाज म्हणाला. केवळ इतकेच नाही तर रणबीर फ्लर्ट करण्याच्या बाबतीत एकदम बेकार आहे, हेही त्याने सांगितले. शिवाय एक किस्साही ऐकवला. इम्तियाजने म्हणाला की, रणबीर फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतो पण ते करताना इतका नर्व्हस होतो की, सगळा खेळच बिघडतो. दिल्लीत एका शूटींगदरम्यान रणबीरला एक मुलगी प्रचंड आवडली होती. दिल्लीच्या या मुलीवर तो लट्टू होता. मी त्या मुलीला ओळखत होतो. तू म्हणशील तर मी तिच्याशी बोलतो, असे मी रणबीरला म्हणालो. तो हो, हो म्हणाला.पण मी त्या मुलीशी बोलायला जात असतानाच त्याने मला मागे ओढले. तू तिला माझ्याबद्दल काहीही सांगशील, असे म्हणून त्याने मला तिच्याजवळ बोलूच दिले नाही. रणबीर इतका नव्हर्स होत असेल तर तो ‘फ्लर्र्ट’ करतो यावर माझा विश्वासच नाही. याबाबती तो अगदी फेल आहे.

Web Title: Yes, Ranbir Kapoor is completely useless in 'Flirt' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.