​होय, नर्गिस भारतात परतली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 19:22 IST2016-08-06T13:52:18+5:302016-08-06T19:22:18+5:30

अभिनेत्री नर्गिस फाखरी  हिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला, अशी बातमी अलीकडेच मीडियात उमटली होती. अर्थात नर्गिसने लगेच या बातमीचे ...

Yes, Nargis returned to India ... | ​होय, नर्गिस भारतात परतली...

​होय, नर्गिस भारतात परतली...

िनेत्री नर्गिस फाखरी  हिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला, अशी बातमी अलीकडेच मीडियात उमटली होती. अर्थात नर्गिसने लगेच या बातमीचे खंडन केले होते. मी लवकरच ‘बॅन्जो’च्या प्रमोशनसाठी भारतात परतणार असल्याचे तिने सांगितले होते. त्यानुसार,नर्गिस मुंबईत परतली. मुंबई विमानतळावर फोटोग्राफर्सनी तिचे फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला असता नर्गिसने आपला चेहरा झाकून घेतला. 





बॉयफ्रेन्ड उदय चोपडासोबत झालेले ब्रेकअप, त्याने लग्नास दिलेला नकार आणि नर्वस ब्रेकडाऊनमुळे नर्गिस अचानक अमेरिकेला निघून गेल्याच्या बातम्या अलीकडे आल्या होत्या . बॉलिवूडमधील फिल्मी करिअर सोडण्याचा निर्णय नर्गिसने घेतला असल्याचा दावा या बातम्यांमध्ये करण्यात आला होता. नर्गिस आता अमेरिकेतील तिचे कुटुंब आणि मित्रांसोबत राहू इच्छिते. बॉलिवूडला कायमचा राम राम ठोकण्याचा निर्धार तिने केलाय,असेही या बातमीत म्हटले गेले होते. असो, अखेर नर्गिस परतलीयं. तिच्या चाहत्यांसाठी यापेक्षा आनंदाची बातमी दुसरी कुठली असू शकेल..होय ना!!

Web Title: Yes, Nargis returned to India ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.