होय, ‘जो जीता वही सिकंदर’ची ‘अंजली’ परततेयं...बनणार ‘आई’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 10:30 IST2017-12-07T05:00:53+5:302017-12-07T10:30:53+5:30
नव्वदच्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आयशा जुल्का गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये दिसलेली नाही. पण आता आयशाच्या चाहत्यांसाठी एक ...
.jpg)
होय, ‘जो जीता वही सिकंदर’ची ‘अंजली’ परततेयं...बनणार ‘आई’!!
व्वदच्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आयशा जुल्का गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये दिसलेली नाही. पण आता आयशाच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. होय, आयशा जुल्का लवकरच बॉलिवूडमध्ये परतणार आहे. पण हिरोईन म्हणून नव्हे तर आईच्या भूमिकेत. होय, ‘गदर’ फेम दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या ‘जीनिअस’ या चित्रपटातून आयशा पुनर्पदार्पण करते आहे. या चित्रपटातून अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष डेब्यू करतो आहे.
![]()
‘जीनिअस’मध्ये उत्कर्षची ‘लव्ह इंटरेस्ट’ इशिता चौहानच्या आईची भूमिका आयशा साकारणार आहे. अनिल यांच्या आग्रहास्तव आयशा ही भूमिका करण्यास राजी झाली आहे. या चित्रपटासाठी अनिल शर्मा यांना आयशाची बरीच मनधरणी करावी लागली आणि अखेर आयशा तयार झाली. तिनेच स्वत:च ही माहिती दिली. नव्याने इंडस्ट्रीत परतण्यासाठी मी राजी नव्हते. पण अनिलने माझा असा काही पिच्छा पुरवला की, मला होकार द्यावाच लागला. या चित्रपटात मी एका स्वतंत्र व बाणेदार महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे, असे तिने सांगितले. चित्रपटाचे फोटोशूट झाले, तेव्हा मी प्रचंड नर्व्हस होते. पण माझा अख्खा जुना स्टाफ माझ्यासोबत असल्याने माझे काम सोपे झाले. माझा डिझाईनार शाहिद आमिर, अनिल यांना सगळ्यांना मी कित्येक वर्षांपासून ओळखते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे म्हणजे, पुन्हा घरी परतण्यासारखे होते, असेही आयशा म्हणाली.
ALSO READ : आयशा जुल्का आठवतेयं; पाहा, तिचे लेटेस्ट लूक!!
११ वर्षांची असताना आयशाने ‘कैसे कैसे लोग’ या चित्रपटांत बालकलाकाराची भूमिका साकारली होती. यानंतर सुमारे ७ वर्षे ती चित्रपटांपासून दूर राहिली. यापश्चात १९९० मध्ये सलमान खानसोबत ‘कुर्बान’ हा तिचा पहिला चित्रपट आला. १९९२ मध्ये अक्षय कुमारसोबतच ‘खिलाडी’, आमिर खानसोबतचा ‘जो जीता वही सिकंदर’या चित्रपटांनी आयशाच्या करिअरला गती दिली. २००३ मध्ये ‘आंच’मध्ये ती दिसली आणि यानंतर हळूहळू इंडस्ट्रीतून गायब झाली. . २००३ मध्येच तिने कंस्ट्रक्शन टायकून समीर वाशीसोबत लग्न केले. आता आयशा स्वत:ही एक यशस्वी बिझनेस वूमन बनली आहे. पतीसोबत कंस्ट्रक्शन, स्पा आणि स्वत:ची क्लोदिंग लाईन असा सगळा व्याप आयशा सांभाळते.