​ होय, इरफान खान ‘करीब करीब सिंगल’!! वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 14:48 IST2017-10-04T09:18:42+5:302017-10-04T14:48:42+5:30

इरफान खान म्हणजे एक प्रतिभावान अभिनेता. व्यक्तिरेखा कुठलीही असो, पडद्यावर ती जिवंत करण्यात इरफान कुठलीही कसर सोडत नाही. इरफानचा ...

Yes, Irfan Khan 'close close' !! Read detailed! | ​ होय, इरफान खान ‘करीब करीब सिंगल’!! वाचा सविस्तर!

​ होय, इरफान खान ‘करीब करीब सिंगल’!! वाचा सविस्तर!

फान खान म्हणजे एक प्रतिभावान अभिनेता. व्यक्तिरेखा कुठलीही असो, पडद्यावर ती जिवंत करण्यात इरफान कुठलीही कसर सोडत नाही. इरफानचा नुकताच येऊन गेलेला ‘हिंदी मीडियम’ हा त्याचा पुरावा म्हणायला हवा. हा चित्रपट अनेकदा बघितला तरी मन भरत नाही. ‘हिंदी मीडियम’मध्ये इरफानला पाहिल्यानंतर त्याच्या जागी दुस-या कुण्या अभिनेत्याची कल्पनाही करवत नाही. हेच इरफानचे निराळेपण आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या आणि तेवढ्याच आव्हानात्मक भूमिका करण्यात कुणीही इरफानचा हात पकडू शकत नाही. आता इरफान असाच एक नवा प्रयोग घेऊन चाहत्यांपुढे येणार आहे. हा प्रयोग म्हणजे, इरफानचा नवा चित्रपट. होय, ‘करीब करीब सिंगल’ नामक चित्रपट इरफान घेऊन येतो आहे. आज या चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च झाले.



पोस्टरमध्ये एक व्यक्ती दिसतोय. त्याचा चेहरा दिसत नाही. पण त्याची शरिरयष्टी बघता, हा इरफानचं असे वाटतेय. नदीकाठी एका मंदिराच्या पाय-या उतरत असलेली व्यक्ती त्यात दिसतेय. या व्यक्तीच्या हातात एक बॅग आहे आणि पायात खडाऊ. बॅगवर ‘योगी’ असे स्पष्ट लिहिलेय. यावरून इरफान या चित्रपटात योगी मार्गावर चालणार, असे दिसतेय. ‘योगी की जर्नी करीब करीब शुरू हो गई है. हमारे साथ बने रहिए,’ असे tweet हे पोस्टर शेअर करताना इरफानने केलेय.

ALSO READ : इरफान खानबद्दल माहित नसलेल्या ११ गोष्टी

‘करीब करीब सिंगल’चे बहुतांश शूटींग हरियाणात झालेय. याशिवाय तीर्थक्षेत्र आहेत, अशा काही ठिकाणीही चित्रपटाची काही दृश्ये चित्रीत झाली आहेत. इरफान खानसोबत या चित्रपटात दिसणार आहे ती अभिनेत्री पार्वती. पार्वती ही साऊथची नावाजलेली अभिनेत्री आहे. चर्चा खरी मानाल तर इरफान या चित्रपटात साधू-संतांशी संबंधित मुद्यावर प्रकाश टाकणार आहे. ‘हिंदी मीडियम’मध्ये इरफानने शिक्षण व्यवस्थेतील प्रमुख दोष दाखवले. ‘करीब करीब सिंगल’मध्ये अशाच एका वास्तव मुद्याला इरफान हात लावणार आहे. तनुजा चंद्रा दिग्दर्शित हा चित्रपट येत्या १० नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. तोपर्यंत हे पोस्टर बघा आणि ते कसे वाटते, तेही आम्हाला कळवा. 

Web Title: Yes, Irfan Khan 'close close' !! Read detailed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.