होय, मी बाप बनणार आहे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 16:31 IST2016-04-17T11:01:10+5:302016-04-17T16:31:10+5:30
बॉलिवूडचा चॉकलेटी हिरो शाहीद कपूर याच्या घरी पाळणा हलणार असल्याच्या बातम्या आपण ऐकत आहोत, अर्थात ही बातमी खरी की ...

होय, मी बाप बनणार आहे!
ब लिवूडचा चॉकलेटी हिरो शाहीद कपूर याच्या घरी पाळणा हलणार असल्याच्या बातम्या आपण ऐकत आहोत, अर्थात ही बातमी खरी की खोटी, हे कळायला मार्ग नव्हता. पण आता खुद्द शाहीदनेच याची कबुली दिली आहे. होय, मी बाप बनणार आहे, अशी गोड कबुली शाहीदने आज ‘उडता पंजाब’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी दिली. तू भविष्यात बाप बनण्यासाठी कितपत तयार आहे, असा प्रश्न प्रारंभी शाहीदला विचारला. यावर तुम्ही असे आडून प्रश्न का विचारता? असा प्रतिप्रश्न शाहीदने केला. यानंतर पत्रकारांमध्येही उत्साह संचारला. मग काय, तू बाप बनणार, असे आम्ही ऐकलेयं, ते खरे आहे का? असा थेट प्रश्न शाहीदला विचारला गेला. शाहीदनेही या प्रश्नाचे तितकेच थेट उत्तर दिले. होय, मी बाप बनणार आहे, असे त्याने सांगितले. शाहीद व मीरा गतवर्षी जुलै महिन्यात लग्नगाठीत अडकले होते.