होय, अरबाज खान या ‘रोमानियन ब्युटी’ला करतोय डेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 15:44 IST2017-03-29T10:13:14+5:302017-03-29T15:44:56+5:30
अठरा वर्षे एकत्र संसार केल्यानंतर अलीकडे अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय ...

होय, अरबाज खान या ‘रोमानियन ब्युटी’ला करतोय डेट!
अ रा वर्षे एकत्र संसार केल्यानंतर अलीकडे अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलाही आणला. यानंतर या घटस्फोटामागच्या कारणांची चर्चा सुरु झाली. अरबाजचे मन कुण्या दुसºया लेडीवर आल्याचे बोलले गेले. कधी गोव्यातील ‘येलो’ला अरबाज डेट करत असल्याच्या बातम्या आल्या तर कधी त्याच्या रोमानियन लेडीसोबतच्या डेटिंगच्या बातम्या उठल्या. पण आता या सगळ्या चर्चेमागचे सत्य समोर आले आहे. होय, अरबाजने खुद्द त्याचे रिलेशनशिप स्टेट्स जाहिर केले आहे. अरबाज एका रोमानियन ब्युटीला डेट करतोय. होय, हे खरे आहे. एका मुलाखतीत अरबाजने ही बाब कबुल केली.
![]()
तुझ्या डेटिंगबद्दल अनेक चर्चा ऐकायला येत आहेत, यात काही तथ्य आहे का? असा प्रश्न अरबाजला विचारण्यात आला. यावर अरबाजने कुठलेही आढेवेढे न घेता, सगळे सांगून टाकले.
![]()
![]()
डेट? कुणाला? येलोला म्हणत असाल तर ती माझी केवळ एक चांगली मैत्रिण आहे, एवढेच मी सांगेल. मी जेव्हा केव्हा गोव्यात जातो, तिला भेटतो. ती एका रेस्टॉरंटची मालक आहे, असे तो म्हणाला. ही यॅलो रोमानियाची राहणारी आहे का? असा प्रश्न यानंतर अरबाजला विचारला गेला. यावर अरबाज जे बोलला ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. नाही, ती वेगळी आहे. तिचे नाव अलेक्झेंड्रिया आहे. ती माझी मैत्रिण आहे. मी तिच्यासोबत डेट करतोय का? असे विचाराल तर होय, मी डेट करतोय. पण आम्ही दोघेही रिलेशनशिपमध्ये नाही. असे व्हायला अद्याप बराच वेळ आहे, असे अरबाज म्हणाला.
![]()
एकंदर काय, तर अरबाजच्या आयुष्यात एका रोमानियन ब्युटीची एन्ट्री झाली आहे. आता ही रोमानियन ब्युटी अरबाजचे आयुष्य किती ‘सुंदर’ करते, ते बघूच.
.jpg)