होय, पडद्यावर दिसणार अक्षय-भूमीची फ्रेश जोडी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 20:49 IST2016-09-11T15:19:56+5:302016-09-11T20:49:56+5:30
नीरज पांडे यांचा ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ हा आगामी चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’वर आधारित असल्याचे ...

होय, पडद्यावर दिसणार अक्षय-भूमीची फ्रेश जोडी!
न रज पांडे यांचा ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ हा आगामी चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’वर आधारित असल्याचे मानले जातेय. या अभियानाच्या अवतीभवती फिरणारी एक हलकी-फुलकी विनोदी कथा यात पाहायला मिळणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये हा चित्रपट फ्लोअरवर येणार असा अंदाज आहे. आता या चित्रपटातील स्टारकास्टबद्दल निश्चित उत्सूकता असणारच. या चित्रपटात अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर दिसणार अशी चर्चा होती. पण या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. पण नीरज पांडे यांनी मात्र आता या चित्रपटात अक्षय-भूमी हीच जोडी असणार असल्याचे स्पष्ट केले. अलीकडे भूमी नीरज पांडे यांच्यासोबत अनेक मीटिंग करताना दिसली होती. त्यामुळेच आता अक्षय व भूमी अशी फ्रेश जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे.