‘ये जवानी है दीवानी’ फेम एवलिन शर्माने गुपचूप बांधली लग्नगाठ, लग्नानंतर पहिला फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 10:50 AM2021-06-07T10:50:35+5:302021-06-07T10:55:10+5:30

Evelyn Sharma Wedding : एवलिन व तुषान यांनी ऑक्टोबर 2019 रोजी साखरपुडा केला होता. साखरपुड्यानंतर दोघांचाही एकमेकांना किस करतानाचा फोटो समोर आला होता.

yeh jawaani hai deewani fame evelyn sharma marries tushaan bhindi in an intimate ceremony | ‘ये जवानी है दीवानी’ फेम एवलिन शर्माने गुपचूप बांधली लग्नगाठ, लग्नानंतर पहिला फोटो आला समोर

‘ये जवानी है दीवानी’ फेम एवलिन शर्माने गुपचूप बांधली लग्नगाठ, लग्नानंतर पहिला फोटो आला समोर

googlenewsNext
ठळक मुद्दे2012 मध्ये ‘फ्रॉम सिडनी विथ लव्ह’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्री एवलिन एवलिन शर्माचा जन्म जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे झाला.

गेल्या 4 जूनला बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने गुपचूप लग्नगाठ बांधली. आता बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री गूपचूप लग्नबंधनात अडकली आहे. होय, ‘ये जवानी है दीवानी’ (Yeh Jawaani Hai Deewani) फेम अभिनेत्री एवलिन शर्माने (Evelyn Sharma ) लग्न केलेय. ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाचा डेंटल सर्जन डॉ. तुषान भिंडीसोबत (Dr. Tushaan Bhindi) एवलीनने लग्नगाठ बांधली.
ब्रिस्बेन येथे गत 15 मे रोजी हा विवाह सोहळा पार पडल्याचे कळते. या विवाह सोहळ्याचे काही फोटो आत्ता कुठे समोर आले आहेत.  (Evelyn Sharma Wedding)

एवलिन व तुषान यांनी ऑक्टोबर 2019 रोजी साखरपुडा केला होता. साखरपुड्यानंतर दोघांचाही एकमेकांना किस करतानाचा फोटो समोर आला होता.  सिडनीच्या हार्बर ब्रीजसमोर दोघांचा साखरपुडा पार पडला होता.आता एवलीन व तुषान यांनी लग्न केलेय.

स्वत: एवलीनने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बेस्ट फ्रेन्डसोबत लग्न, आयुष्यात यापेक्षा आनंददायी अनुभव दुसरा कुठलाही नाही. आम्ही एकमेकांसोबत आयुष्य घालवण्यासाठी उत्सुक आहोत, असे एवलीनने सांगितले.
लग्नसोहळ्यात एवलिनने व्हाईट कलरचा गाऊन घातला होता तर तुषानने ब्ल्यू सूट निवडला होता. कोरोनामुळे अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.  एवलिनच्या लग्नात तिची आई सुद्धा हजर नव्हती. वेडिंग सेरेमनी अगदी साधेपणाने पार पडली. मात्र यानंतर एक ग्रॅण्ड सेरेमनी करण्याचे दोघांचे प्लानिंग आहे. 

एवलिन व तुषानची पहिली भेट 2018 साली झाली होती. दोघेही एका ब्लाइंट डेटवर एकमेकांना भेटले होते. दोघांच्या मित्रांनी ही ब्लाइंड डेट अरेंज केली होती. यानंतर दोघांमध्ये प्रेम फुलले. 2019 मध्ये सिडनीच्या हार्बर ब्रीजवर गुडघ्यावर बसून तुषानने एवलिनला प्रपोज केले होते.

2012 मध्ये ‘फ्रॉम सिडनी विथ लव्ह’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्री एवलिन एवलिन शर्माचा जन्म जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे झाला. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी युकेमध्ये तिने शिक्षण पूर्ण केले. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणच्या ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटातील भूमिकेनंतर एवलिन प्रकाशझोतात आली. मैं तेरा हिरो आणि जब हॅरी मेट सेजल या सिनेमातही ती दिसली होती.

Web Title: yeh jawaani hai deewani fame evelyn sharma marries tushaan bhindi in an intimate ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.