'यारी है इमान मेरा'....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 13:08 IST2016-05-06T07:38:40+5:302016-05-06T13:08:40+5:30
'यारी है इमान मेरा, यार मेरी जिंदगी' बिग बी अमिताभ बच्चन यांच्या 'जंजीर' सिनेमातील गाण्याच्या ओळी सा-यांनाच माहिती. आता ...

'यारी है इमान मेरा'....
कारण अमर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या टीकेला उत्तर देणार नसल्याचं बिग बींनी एका कार्यक्रमात सांगितलं. "अमरसिंह माझे मित्र आहेत, त्यांना माझ्याबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार आहे" असं बिग बींनी स्पष्ट केलं आहे.
अमरसिंह आणि अमिताभ बच्चन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. मात्र काही दिवसांआधी त्यांच्या याच मैत्रीत दुरावा आल्याचं समोर आलं होतं. बोफोर्स घोटाळ्याची फाईल ईडीनं उघडली तर बिग बी अडचणीत येतील असा दावा काही दिवसांआधी अमरसिंह यांनी केला होता.
हे कमी होतं म्हणून की काय जया बच्चन यांना पक्षात घेऊ नका असं अमिताभ बच्चन यांनी आपल्याला सांगितलं होतं मात्र त्यांचं आपण ऐकलं नाही असा दावाही अमरसिंह यांनी केला होता.