यामी गौतम करणार ‘सरकार ३’मध्ये अॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 09:41 IST2016-12-13T21:21:58+5:302016-12-14T09:41:43+5:30
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम सध्या चांगलीच खूश आहे. हृतिक रोशन याच्यासोबतचा ‘काबिल’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे अमिताभ ...
.jpg)
यामी गौतम करणार ‘सरकार ३’मध्ये अॅक्शन
यामी म्हणाली, ‘सरकार ३’मध्ये मी अॅक्शन दृश्ये साकारणार असल्याने उत्साहित आहे. मी पहिल्यांदाच असा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक अभिनेता आपल्या नव्या पैलूला समोर आणण्याचा प्रयत्नात असतो. मी याहून काही वेगळी नाही. आम्ही शूटिंगला सुरुवात केली असून लवकरच माझी भूमिका सेटवर येणार असल्याचे यामीने सांगितले.
निर्माता दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून ‘सरकार’ सिरीजमध्ये प्रथमच महिला कलाकाराच्या वाट्याला अॅक्शन दृश्ये आली आहेत. यामीने यासाठी चांगलीच तयारी केली आहे. ‘सरकार ३’ हा राजकीय गुन्हेगारीवर आधारित चित्रपट असून यात अमिताभ बच्चन पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच जॅकी श्रॉफ, मनोज वाजपेयी, रोनित रॉय, रोहिनी हट्टंगडी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी १७ मार्चला जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.
यामी गौतम हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेल्या व संजय गुप्ता दिग्दर्शित काबिल या चित्रपटात अंध मुलीची भूमिका साकारताना दिसेल. हृतिक रोशनच्या आगामी ‘क्रिश ४’ मध्ये यामी सोबत काम करणार असल्याचे ट्विट हृतिकने केले होते. यामुळे येणाºया काही चित्रपटातही ती अॅक्शन दृश्ये साकारतान दिसू शकते असा अंदाज लावण्यात येत आहे.