Article 370 : गरोदर असताना यामी गौतमने शूट केले ॲक्शन सीन्स, म्हणाली - "पहिलं मूल..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 06:03 PM2024-02-08T18:03:03+5:302024-02-08T18:03:39+5:30

गरोदर असतानाच यामीने 'आर्टिकल ३७०'मधील अॅक्शन सीन्सही शूट केले. प्रेग्नन्सीमध्ये सिनेमाचा शूटिंग अनुभव यामीने शेअर केला.

yami gautam shoot action seens of article 370 movie in pregnancy | Article 370 : गरोदर असताना यामी गौतमने शूट केले ॲक्शन सीन्स, म्हणाली - "पहिलं मूल..."

Article 370 : गरोदर असताना यामी गौतमने शूट केले ॲक्शन सीन्स, म्हणाली - "पहिलं मूल..."

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम तिच्या आगामी 'आर्टिकल ३७०' सिनेमाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. यामी गौतम लवकरच आई होणार आहे. 'आर्टिकल ३७०'च्या ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला यामी आणि तिचा पती आदित्य थारने ही खुशखबर चाहत्यांना दिली आहे. गरोदर असतानाच यामीने 'आर्टिकल ३७०'मधील अॅक्शन सीन्सही शूट केले. ट्रेलर लॉन्चदरम्यान मीडियाशी साधलेल्या संवादात यामीने याचा खुलासा केला. 

प्रेग्नन्सीमध्ये सिनेमाचा शूटिंग अनुभव यामीने शेअर केला. ती म्हणाली, "पहिलं मूल नेहमीच चॅलेजिंग असतं. त्यामुळे माझ्यासाठी देखील हे मानसिकदृष्ट्या थकवा आणणारं होतं. मी तर यावर आता पुस्तक लिहू शकते. पण, जर आदित्य माझ्याबरोबर नसता तर मी हे करू शकले नसते. अशावेळी तुम्हाला काळजी घेण्याची आवश्यकता असते. मी सगळ्या डॉक्टरांचे आभार मानते. ते लपून माझ्यावर लक्ष ठेवायचे. मला चेक करायचे. गरोदरपणात काम करण्याची प्रेरणा मला माझ्या आईकडून मिळाली आहे. कारण, मी तिला प्रत्येक प्रसंगात काम करताना पाहिलेलं आहे." 

'आर्टिकल ३७०' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मुंबईत पार पडला. यामीने या सोहळ्यात ब्लेझर घालून आली होती. ती बेबी बंपही लपवताना दिसली. गेल्या काही दिवसांपासूनच यामीच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा सुरू होत्या. तिचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. आता अखेर यामीचा पती आदित्यने ट्रेलर लॉन्च सोहळ्यातच ते आईबाबा होणार असल्याचं सांगितलं आहे. 

यामी गौतम मुख्य भूमिकेत असलेल्या 'आर्टिकल ३७०' सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य जांभळे यांनी केलं आहे. तर आदित्य थार आणि लोकेश थार यांनी निर्मिती केली आहे. यामीबरोबर या सिनेमात प्रिया मणि, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल यांच्या मुख्य भूमिका आहेत. अरुण गोविल या सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत आहेत. मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादीही झळकला आहे. हा सिनेमा २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. 
 

Web Title: yami gautam shoot action seens of article 370 movie in pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.