एक्स बॉयफ्रेंड साहिल खानने आयशा श्रॉफला फटकारले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 17:22 IST2018-03-25T11:52:31+5:302018-03-25T17:22:31+5:30
सीडीआर प्रकरणी आता साहिल खानने एक व्हिडीओ अपलोड केला असून, त्यामध्ये तो आयशा श्रॉफला फटकारताना दिसत आहे. पाहा व्हिडीओ!

एक्स बॉयफ्रेंड साहिल खानने आयशा श्रॉफला फटकारले!
‘ ्टाइल’ अभिनेता साहिल खान आणि जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफ यांचे अफेअर असल्याची चर्चा गेल्या कित्येक काळापासून बी-टाउनमध्ये रंगत आहे. मधल्या काळात या दोघांमध्ये वितुष्ठ निर्माण झाल्याचे समोर आले होते. आता आयशाचे नाव सीडीआर प्रकरणात आल्याने पुन्हा एकदा साहिल आणि आयशामधील वाद चव्हाट्यावर आला आहे. आयशावर आरोप आहे की, साहिल खानच्या कॉल डिटेलची जबाबदारी तिने अॅड. रिजवान सिद्दीकी यांच्यावर बेकायदेशीररीत्या सोपविली होती. सिद्दीकीने कॉले डिटेल मिळविताच साहिलला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणावर आता साहिल खानचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये तो आयशा श्रॉफ हिला चांगलेच फटकारताना दिसत आहे.
साहिलने हा व्हिडीओ यू-ट्यूबवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये साहिल म्हणतोय की, ‘आयशाने जे काही केले तो खूप मोठा गुन्हा आहे. लोक मला फोन करीत आहेत. या गोष्टीला चार वर्षे पूर्ण झाले आहेत. मी या सर्व गोष्टींपासून आता पुढे गेलो आहे. मी तिला केव्हाच माफही केले आहे. मला नाही माहीत की, हे सर्व करण्यामागे तिचा नेमका काय हेतू आहे. हे सर्व कर्माचे भोग आहेत. कदाचित तिच्या कर्मात दुसरेच काहीतरी लिहून ठेवले असावे. कर्माचे फळ सर्वांनाच मिळत असते.
दरम्यान, २००९ मध्ये या दोघांना नेहमीच एकत्र बघण्यात आले आहे. साहिल आयशापेक्षा १७ वर्षांनी लहान आहे. साहिल आणि आयशा एकेकाळी बिझनेस पार्टनर होते. परंतु काही काळानंतर त्यांच्यात ब्रेकअप झाले. पुढे २०१४ मध्ये आयशाने साहिलविरोधात गुन्हा दाखल केला होता. यावेळी साहिलने माझी आठ कोटी रूपयांची फसवणूक केल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते. एवढेच काय तर जॅकी श्रॉफनेही साहिल खान आणि परिवाराने आमची इमेज खराब केल्याचा आरोप करताना बदनामीचा गुन्हा दाखल केला होता.
पुढे २०१५ मध्ये न्यायालयाने साहिलला श्रॉफ परिवाराची माफी मागण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आयशानेही तिची तक्रार मागे घेतली होती. साहिलने २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्टाइल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते.