दिग्दर्शनाच्या मैदानात लेखक अपयशीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2016 12:04 IST2016-01-16T01:08:56+5:302016-01-31T12:04:26+5:30
मिलाप जवेरी हे नाव चित्रपट कथा लेखकांच्या यादीतील मोठे नाव आहे. परंतु ते जेव्हा दिग्र्दशनाच्या मैदानात दाखल झाले तेव्हा ...

दिग्दर्शनाच्या मैदानात लेखक अपयशीच
म लाप जवेरी हे नाव चित्रपट कथा लेखकांच्या यादीतील मोठे नाव आहे. परंतु ते जेव्हा दिग्र्दशनाच्या मैदानात दाखल झाले तेव्हा मात्र त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. इंद्र कुमारच्या 'मस्ती' बरोबरच 'एक विलेन' आणि 'मैं तेरा हीरो' सारख्या चित्रपटांचे लेखन करून मिलाप जवेरी रातोरात प्रसिद्ध झाले. काहीच दिवसात त्यांनी रितेश देशमुख ला घेऊन 'जाने कहां से आई है' हा चित्रपट बनवला. पण, तो बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरला.
लापचे म्हणणे आहे की, अनेक लेखकांचे स्वप्न दिग्दर्शनाच्या मैदानात उतरण्याचे असते. यात तो आपल्या कथेला न्याय देऊ शकतो. म्हणूनच मी सुरुवातीच्या अपयशानंतरही आता 'मस्तीजादे' निर्माण करीत आहे ज्यात सनी लियोन मेन रोल करतेय. ही झाली मिलापची गोष्ट. आणखी असे अनेक लेखक आहेत. ज्यांनी असा प्रयत्न केला. परंतु यश मिळत नसल्याने दिग्दर्शनाच्या क्षेत्राकडे पाठ फिरवली. या क्रमातील सागर सरहदीच्या 'बाजार' चित्रपटाला यश मिळाले. परंतु त्यांचा पुढचा चित्रपट 'तेरा शहर' ला कोणी वितरक मिळाला नाही आणि हा चित्रपट अखेर रिलीजच झाला नाही.
राजेंद्र सिंह बेदी सारखा लेखक 'फागुन' आणि 'दस्तक' सारख्या चित्रपटानंतर 'एक चादर मैली सी' बनविण्यासाठी संघर्ष करीत राहिला. हा चित्रपट त्यांच्या निधनानंतरच पूर्ण झाला. एक अजून प्रसिद्ध लेखक सचिन भौमिक यांनी दिग्दर्शनाच्या अपयशाचा अनुभव घेतला. त्यांचा 'राजा रानी' एवढा फ्लॉप झाला की ते पुन्हा या क्षेत्राकडे कधी वळलेच नाही. अनीस बज्मीपासून रुमी जाफरी, दिलीप शुक्ला, अब्बास टायरवाला, अनुराग कश्यप, गिरीश धमीजा, सुपरण वर्मा, नीरज वोहरा आणि केके सिंह सारख्या डझनभर लेखकांनी दिग्दर्शकाची खुर्ची सांभाळली.
रुमी जाफरीला 'गॉड तुसी ग्रेट हो'साठी अमिताभ बच्चन आणि सलमान खानसोबत प्रियंका चोपडाची टीम मिळाली, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एक दिवसही टिकू शकला नाही. केके सिंह संवादांसाठी प्रसिद्ध होते. त्यांचा 'वीरगती' सलमान खान असूनही बॉक्स ऑफिसवर आपटला. सुपरण वर्मा यांनी 'एक खिलाड.ी एक हसीना'साठी फिरोज खान आणि फरदीन खानला सोबत घेतले, मात्र हे मिश्रण बेमेल ठरले आणि चित्रपट सुपर फ्लॉप झाला.
अनुराग कश्यप आणि अनीस बज्मी हेच असे लेखक आहेत, त्यांची दिग्दर्शनाची दुकान चालली आणि त्यासाठी अव्वल निर्मात्यांच्या क्षमतेपेक्षा त्यांच्या भक्तीभावाला जास्त महत्त्वाचे मानले गेले.