WOW! Don't Miss This Video! आईस्क्रीमवाल्याच्या करामती पाहून आमिर खानही झाला अवाक्!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 12:39 IST2017-10-08T07:09:41+5:302017-10-08T12:39:41+5:30

या व्हिडिओत आमिर एका आईस्क्रीमच्या दुकानाबाहेर उभा आहे. या दुकानातील आईस्क्रीम विकणारा एक नोकर अशा काही करामती दाखवतोय की, आमिर सुद्धा त्या पाहून अवाक् झालाय.

WOW! Do not Miss This Video! Aamir Khan too was surprised to see the cream of the ice cream! | WOW! Don't Miss This Video! आईस्क्रीमवाल्याच्या करामती पाहून आमिर खानही झाला अवाक्!!

WOW! Don't Miss This Video! आईस्क्रीमवाल्याच्या करामती पाहून आमिर खानही झाला अवाक्!!

िर खानचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतो आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर खान तुर्कस्थानात आहे. याठिकाणचा आमिरचा एक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आमिर ही ट्रिप किती एन्जॉय करतोय, हे तुम्हाला कळून चुकेल. आमिरने स्वत: सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत आमिर एका आईस्क्रीमच्या दुकानाबाहेर उभा आहे. या दुकानातील आईस्क्रीम विकणारा एक नोकर अशा काही करामती दाखवतोय की, आमिर सुद्धा त्या पाहून अवाक् झालाय. ‘सब्र का फल मीठा होता है, लव्हली टर्की आईस्क्रीम,’ या कॅप्शनसह आमिरने हा व्हिडिओ पोस्ट केलायं आणि विशेष म्हणजे आत्तापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे.



आमिर आपल्या आईस्क्रीमचीची प्रतीक्षा करत एका आईस्क्रीम पार्लरबाहेर उभा आहे. यानंतर दुकानदार आपल्या अनोख्या अंदाजात आमिरला आईस्क्रीम देतो. पण त्यापूर्वी तो कधी देतो, कधी चकवतो. दुकानदाराच्या अनोख्या करामती आणि आमिरच्या चेहºयावरील खट्याळ हास्य दर्शवणारा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहºयावर हसू उमलल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हा अनोखा व्हिडिओ तुम्ही पाहायलाच हवा.

ALSO READ : आमिर खानला पहिली पत्नी आणि मुलांविषयी ‘या’ गोष्टीमुळे होतोय पश्चाताप!

‘सीक्रेट सुपरस्टार’ या सिनेमात आमिरने शक्ती कुमार नावाची   भूमिका साकारली आहे. या सिनेमातील आमिरचा लूक त्याने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळा असणार आहे.  विचित्र हेअर स्टाईल, अतरंगी दाढी आणि रंगीबेरंगी आणि हटके कपडे या अवतारात शक्ती कुमार म्हणजेच आमिर खान पाहायला मिळणार आहे. अर्थात चित्रपटात त्याचा कॅमिओ आहे. जायरा वसीम यात मुख्य भूमिकेत आहे.आमिरच्या प्रॉडक्शन हाऊसखाली तयार होणाºया या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत अद्वैत चंदन. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणाºया ‘सीक्रेट सुपरस्टार’ची लीड अ‍ॅक्ट्रेस जायरा वसीम ही आमिरच्या ‘दंगल’मध्येही दिसली होती. गीता फोगटच्या लहानपणाची भूमिका तिने साकारली होती. गायिका बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाºया एका मुलीची ही कथा आहे.

Web Title: WOW! Do not Miss This Video! Aamir Khan too was surprised to see the cream of the ice cream!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.