स्वरा करणार ‘वेब सीरिज’ मध्ये काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 15:52 IST2016-08-25T10:22:04+5:302016-08-25T15:52:04+5:30

 स्वरा भास्कर ही एक अतिशय जाणकार अभिनेत्री आहे. तिने आत्तापर्यंत केलेल्या भूमिका तिच्यातील कलाकार किती अनुभवसंपन्न आहे हे प्रत्येकवेळेस ...

Work in 'Web Series' to Swaraj? | स्वरा करणार ‘वेब सीरिज’ मध्ये काम?

स्वरा करणार ‘वेब सीरिज’ मध्ये काम?

 
्वरा भास्कर ही एक अतिशय जाणकार अभिनेत्री आहे. तिने आत्तापर्यंत केलेल्या भूमिका तिच्यातील कलाकार किती अनुभवसंपन्न आहे हे प्रत्येकवेळेस दाखवतो. ‘निल बटे सन्नाटा’ मध्ये तिने केलेला आईचा अभिनय दर्जेदार होता.

आता ती वेब सीरिजमध्ये डेब्यू करणार आहे. ती टीव्ही कलाकार विवान भटाने, अक्षय ओबेरॉय आणि करणवीर मेहरा यांच्यासोबत दिसणार आहे. तिला वेब सीरिजमध्ये काम करण्याचे कारण विचारले असता ती म्हणते,‘माध्यमे गतीने बदलत आहेत.

नवनवीन कल्पना पुढ्यात येत आहेत. एक कलाकार म्हणून मी येणारी प्रत्येक संधी एक आव्हान म्हणून स्विकारली पाहिजे. माझ्या चाहत्यांसाठी हा नवीन प्लॅटफॉर्म आहे. चाहत्यांना भेटायला काही कारण किंवा ठिकाण आवश्यक नसते. याअगोदर मी कधीच केले नव्हते अशा भूमिका मी आता करायच्या ठरवल्या आहेत.’

Web Title: Work in 'Web Series' to Swaraj?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.