विचित्र अफवांनी त्रासली श्रद्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2016 18:03 IST2016-11-20T18:03:48+5:302016-11-20T18:03:48+5:30

‘बी टाऊन’ मध्ये सध्या प्रचंड बिझी असलेली अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. बॉक्स आॅफिसवर ‘ रॉक आॅन २’ फार काही ...

Wonders of strange rumors | विचित्र अफवांनी त्रासली श्रद्धा

विचित्र अफवांनी त्रासली श्रद्धा

ी टाऊन’ मध्ये सध्या प्रचंड बिझी असलेली अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. बॉक्स आॅफिसवर ‘ रॉक आॅन २’ फार काही कमाल दाखवू शकला नसल्याने ती नाराज आहे. ‘हाफ गर्लफ्रेंड’ आणि ‘ओके जानू’ या दोन चित्रपटांची ती सध्या शूटिंग करते आहे. त्यामुळे तिला ‘बी टाऊन’च्या इतर गॉसिपिंगकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये. मात्र, एक चर्चा तिच्याबाबतीत अशी सुरू आहे की, श्रद्धा आणि आलिया यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे. बरं, आता याचे कारण विचाराल तर सिद्धार्थ मल्होत्रा.

श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यातील वाढती जवळीक आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूरच्या नात्यात दुरावा आणतेय, अशी चर्चा सुरू आहे. पण, या चर्चांना श्रद्धा अफवा मानते आणि या चर्चेला नकार दिला आहे. 

‘रॉक आॅन २’ को-स्टार फरहान अख्तर याच्यासोबतही श्रद्धा कपूरचे नाव जोडले गेले होते. पण, त्या केवळ अफवाच होत्या असे श्रद्धा सांगते. या अफवा कोणीतरी मुद्दामहून पसरवत आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. केवळ लक्ष्य आकर्षित करून घेण्यासाठी हे सर्व केले जात असल्याचे श्रद्धाचे म्हणणे आहे.

Web Title: Wonders of strange rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.