womens day : विराट कोहली म्हणतोय, अनुष्का शर्मा माझ्या आयुष्यातील स्ट्रॉग लेडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 16:25 IST2017-03-08T10:47:46+5:302017-03-08T16:25:36+5:30

​जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने स्पष्ट केले की, तो त्याची गर्लफे्रण्ड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यावर केवळ प्रेमच नाही तर तिचा आदरही करतो.

womens day: Virat Kohli says, Anushka Sharma is a stroke lady in my life | womens day : विराट कोहली म्हणतोय, अनुष्का शर्मा माझ्या आयुष्यातील स्ट्रॉग लेडी

womens day : विराट कोहली म्हणतोय, अनुष्का शर्मा माझ्या आयुष्यातील स्ट्रॉग लेडी

गतिक महिला दिनानिमित्त भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने स्पष्ट केले की, तो त्याची गर्लफे्रण्ड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यावर केवळ प्रेमच नाही तर तिचा आदरही करतो. विराटने महिला दिनाचे औचित्य साधून आई आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या. खरं तर विराट आणि अनुष्का नेहमीच अशा दिवसांमुळे चर्चेत येत असतात; मात्र दोघांनीही त्यांच्या नात्याविषयी कधीच वाच्यता केली नाही. गेल्या व्हॅलेण्टाइन दिनानिमित्त दोघांनीही एकत्र फोटो शेअर केला होता, आता पुन्हा विराटने अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर करून त्याच्या आयुष्यातील अनुष्काचे महत्त्व अधोरेखित केले आहे. 

त्याचबरोबर विराटने शेअर केलेल्या या पब्लिकली फोटोमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की, दोघांमधील नाते बळकट आहे. विराटने शेअर केलेला फोटो कोलार्ज असून, त्यामध्ये वरच्या भागात विराट त्याच्या आईबरोबर दिसत आहे. तर फोटोच्या खालच्या भागात तो त्याची गर्लफे्रण्ड अनुष्का शर्मा हिच्यासोबत दिसत आहे.  विराटने या फोटोला कॅप्शनदेखील दिली आहे. त्याने लिहिले की, महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा, मात्र मी माझ्या आयुष्यातील सर्वाधिक महत्त्व असलेल्या दोन महिलांनाही या दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. एक तर माझी आई जिने अतिशय कठीण काळात परिवार एकसंघ ठेवला आहे. अन् दुसरी म्हणजे अनुष्का शर्मा जी आजही विसंगत परिस्थितीचा सामना करून सत्याच्या बाजूने उभी आहे. तसेच तिने इतरांसाठी आवाहनही उभे केले आहे. 
 

सध्या अनुष्का शर्मा तिच्या आगामी ‘फिलौरी’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा अनुष्काच्या प्रॉडक्शन हाउसमध्ये बनणारा दुसरा सिनेमा आहे; मात्र मध्येच अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या की, या सिनेमाला बॉयफ्रेण्ड विराटने फायनान्स केले आहे; मात्र अनुष्काने या चर्चेचे खंडन करताना म्हटले होते की, विराटचा या सिनेमाशी काहीही संबंध नाही. अशा प्रकारच्या विनाकारण चर्चा पसरवून तुम्ही माझी अन् या सिनेमाशी जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीची अवहेलना करीत असल्याचे म्हटले होते. 

Web Title: womens day: Virat Kohli says, Anushka Sharma is a stroke lady in my life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.