महिलांनी अत्याचाराच्या विरुद्ध उभे व्हावे - कॅटरिना कैफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 21:29 IST2016-12-06T21:29:14+5:302016-12-06T21:29:14+5:30
बॉलिवूडची बार्बी गर्ल कॅटरिना कैफ हिने महिलांवर होणाºया अत्याचाराविषयी वाचा फोडण्याचे आवाहन केले आहे. महिलांना स्वत:ला कमजोर समजू नये. ...

महिलांनी अत्याचाराच्या विरुद्ध उभे व्हावे - कॅटरिना कैफ
संयुक्त राष्ट्र संघाच्या राष्ट्रीय महिला शाखेच्यावतीने आयोजित युनायटेड संमेलनात ती आपले मत व्यक्त करीत होती. कॅटरिना म्हणाली, जगातील मोठ्या भागावर पितृसत्ताक समाजाचे नेतृत्त्व आहे आणि कित्येक वर्षांपासून महिलांवर अत्याचार बोलण्यापेक्षा ते यावर आपले तोंड बंद करून आहेत. मी अधिकाधिक महिलांना ही विनंती करते की, त्यांनी त्यांच्यावर होणाºया अत्याचारांना वाचा फोडावी. महिलांना त्यांच्यावर होणारे अत्याचार सहन करून नये, तर वैवाहिक बलात्कार व अन्य प्रकारच्या अत्याचारांना सहन न करता त्यांच्याविरुद्ध उभे राहण्याची गरज आहे. कधी कधी शिकलेल्या महिला देखील सामाजिक नियम व कायद्याच्या दबावामुळे विरोधात जाण्याचे टाळतात. त्या त्यांच्यावर होणारे अत्याचार सहन करीत असतात. सामाजिक नियमांचा त्या विरोध करीत नाहीत. आपल्या समाजात अधिकांश लोक वैवाहिक बलात्कार हा अपराध आहे हे मानायलाच तयार नाहीत. याविरोधात आवाज उचलण्याची गरज आहे, असेही ती म्हणाली.
कॅटरिनाने सांगितले, भारतात महिलांवर अत्याचार गुपचूप सहन केले जातात, हे अशा देशांत होत आहे जेथील राष्ट्राध्यक्ष महिला राहिलेली आहे. ब्रिटेनमध्ये पंतप्रधानपदी महिलेल्या नियुक्ती आधी भारतात महिलेने हे पद भूषविले आहे. अमेरिकेत अद्याप एकही महिला राष्ट्राध्यक्ष झालेली नाही. भारतात असलेल्या लैंगिक असमानता पाहून आश्चर्य होते. हे आपल्या साठी दुखद आहे की आपण स्वत: हे होऊ देत आहोत. मात्र एकीकडे हे दुखद चित्र असताना महिला या विरोधात आवाज उठवित आहेत हे जाणून आनंदच होतो असेही तिने सांगितले. यासाठी तिने संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालाचा आधार घेतला.