सलमान खान आता या विनोदी अभिनेत्याला इंडस्ट्रीत पुनरागमन करण्यासाठी करणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 12:41 PM2018-10-29T12:41:16+5:302018-10-29T12:44:29+5:30

बॉबीनंतर आता आणखी एका कलाकाराला सलमान खान मदत करणार आहे. हा कलाकार प्रसिद्ध विनोदी अभिनेता असून एका कार्यक्रमाद्वारे इंडस्ट्रीत पुनरागमन करणार आहे.

will salman khan going to produce the kapil sharma show? | सलमान खान आता या विनोदी अभिनेत्याला इंडस्ट्रीत पुनरागमन करण्यासाठी करणार मदत

सलमान खान आता या विनोदी अभिनेत्याला इंडस्ट्रीत पुनरागमन करण्यासाठी करणार मदत

googlenewsNext

सलमान खान बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचा आजवर गॉडफादर बनला आहे. कॅटरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, आयुष शर्मा, डेझी शाह, जॅकलिन फर्नांडिस यांसारख्या अनेक कलाकारांना त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश करायला, प्रस्थापित व्हायला मदत केली आहे. बॉबी देओल गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्धीझोतात नव्हता. पण सलमानच्या रेस 3 या चित्रपटामुळे बॉबीला एक नवी ओळख मिळाली. बॉबीनंतर आता आणखी एका कलाकाराला सलमान खान मदत करणार आहे.

कपिल शर्माने द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाइट्स विथ कपिल, कॉमेडी सर्कस या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. एकेकाळी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असणारा कपिल गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांपासून दूर आहे. कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो अचानक बंद पडला. त्यानंतर त्याचा फिरंगी हा चित्रपट आपटला. त्यामुळे आता कपिल शर्मा पुनरागमन करूच शकत नाही. पण आता त्याचा द कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस येणार असून या कार्यक्रमाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. 

द कपिल शर्मा शो या कपिलच्या प्रसिद्ध कार्यक्रमाद्वारे कपिल शर्मा पुनरागमन करणार आहे. या कार्यक्रमाची निर्मिती आजवर दोन वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसने केली होती. K9 आणि फ्रेम्स प्रोडक्शन मिळून या कार्यक्रमाची निर्मिती करत होते. पण गेल्या सिझनमध्ये कपिल आणि फ्रेम्स प्रोडक्शनचे चांगलेच वाजले होते. कपिलच्या अनप्रोफेशनल वागण्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे द कपिल शर्माच्या गेल्या सिझनची निर्मिती एकट्या कपिलने केली होती. पण या सिझनसाठी कपिल निर्मात्याच्या शोधात असून सलमान खानने त्याला मदतीचा हात दिला असल्याची चर्चा आहे. सलमान खानच्या सलमान खान प्रॉडक्शन हाऊसतर्फे या कार्यक्रमाची निर्मिती केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. 

द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम जानेवारीत सुरू होणार असून या कार्यक्रमात किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती सारखी द कपिल शर्मा शो मधील जुनी मंडळी दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Web Title: will salman khan going to produce the kapil sharma show?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.