दबंग खान बनणार 'मास्टर', सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपटाचा येणार हिंदी रिमेक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 04:09 PM2021-04-06T16:09:33+5:302021-04-06T16:10:29+5:30

सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. आता तो दक्षिणात्य सिनेमा मास्टरच्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.

Will Salman Khan appear in the Hindi remake of 'Master' ?, the actor put this condition in front of the producers | दबंग खान बनणार 'मास्टर', सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपटाचा येणार हिंदी रिमेक

दबंग खान बनणार 'मास्टर', सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपटाचा येणार हिंदी रिमेक

googlenewsNext

बॉलिवूडचा दबंग खान सलमानच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. तो लवकरच दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसू शकतो. याच कारणामुळे ट्विटरवर #SalmanKhan ट्रेंड होत आहे.


नुकताच प्रदर्शित झालेल्या दाक्षिणात्य चित्रपट मास्टरच्या हिंदी रिमेकमध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत दिसू शकतो. मूळ चित्रपट मास्टरमध्ये विजयने मुख्य भूमिका साकारली आहे आणि या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. मास्टरच्या कमाई सर्वांना थक्क केले आहे. अशात निर्माते या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्यासाठी उत्सुक आहे. असे सांगितले जात आहे की निर्माते मुराद खेतानी हिंदी रिमेकसाठी मागील ३० दिवसांपासून सलमान खानच्या टचमध्ये आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानला देखील मास्टरच्या हिंदी रिमेकचा कॉन्सेप्ट समजले आहे. पण त्याने एक अट ठेवली आहे की चित्रपट बॉलिवूडच्या प्रेक्षकांना डोक्यात ठेवून बनवला पाहिजे. त्याला मूळ चित्रपटाच्या स्क्रीप्टमध्ये बदल हवा आहे.


सलमान खानच्या चाहत्यांना ही गोष्ट समजल्यावर ते खूपच उत्सुक झाले आहेत. त्यांना वाटते की जर मास्टरच्या हिंदी रिमेकमध्ये सलमानला कास्ट केले तर कोटींचा बिझनेस नक्कीच होणार.


सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या त्याचे चाहते त्याच्या राधे-द मोस्ट वाँटेड भाई या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ईदच्या मुहूर्तावर १३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सलमान खानसह जॅकी श्रॉफ, दिशा पटानी, रणदीप हुडा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सध्या सलमान खान टायगर ३च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. किक २ या चित्रपटातूनही सलमान खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साजिद नाडियादवाला निर्मित कभी ईद कभी दिवाली या चित्रपटातही सलमान खान काम करणार आहे.

Web Title: Will Salman Khan appear in the Hindi remake of 'Master' ?, the actor put this condition in front of the producers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.