नेहा कक्कर देणार का 'गुडन्यूज', समोर आलेल्या व्हिडिओतून झालं उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 02:46 PM2021-08-17T14:46:05+5:302021-08-17T14:52:13+5:30

सोशल मीडियावरच नेहा कक्करने तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. रोहनप्रीत आणि ती नात्यात असण्यालं जेव्हा नेहाने सांगितलं त्याच्या काही दिवसांनंतरच नेहाने लग्नही केलं.

Will Neha surprise her fans by pregnancy news, check this video for revealing the fact | नेहा कक्कर देणार का 'गुडन्यूज', समोर आलेल्या व्हिडिओतून झालं उघड

नेहा कक्कर देणार का 'गुडन्यूज', समोर आलेल्या व्हिडिओतून झालं उघड

googlenewsNext

लग्नानंतर दोनच महिन्यात नेहा कक्करने बेबी बंम्प फ्लॉन्ट करत चाहत्यांना गुगली टाकली होती. त्यावेळी ती प्रेग्नंट असल्याच्या भरपूर चर्चा रंगल्या होत्या. बेबी बंम्पचा फोटो पाहून फक्त तिचे चाहतेच नाही तर इतरांनाही मोठा आश्चर्याचा धक्काच बसला होता.

'इंडियन आडल १२' सिझनलाही ती जज करत होती. मध्येच तिने हा शो सोडला आणि तिच्या जागी बहिण सोनू कक्कर जज करताना दिसली. फिनालेमध्ये नेहा कक्कर उपस्थित नव्हती. त्यामुळे नेहा प्रेग्नंट असल्याच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. सध्या कोणत्याच शोमध्ये झळकत नसली तरी नेहा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. 

सध्या कुठेच बाहेर फिरताना किंवा कोणत्या इव्हेटमध्येही नेहा कक्कर हजेरी लावत नाही. मात्र नेहाचे अखेर रहस्य बाहेर आलेच. नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रोहनप्रीत सिंगसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती आपला बेबी बंप फ्लॉन्ट करत नसली तरी बेबी बंम्प दिसत आहे. त्यामुळे नेहा कक्कर प्रेग्नंट असल्याचे व्हिडीओमुळे उघड झाल्याचे स्पष्ट आहे.


सोशल मीडियावरच नेहाने तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. रोहनप्रीत आणि ती नात्यात असण्यालं जेव्हा नेहाने सांगितलं त्याच्या काही दिवसांनंतरच नेहाने लग्नही केलं.

नेहा आणि रोहनप्रीतच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नामुळे नेहा कक्करच्या रिलेशनशिपपासून ते लग्नापर्यंत आणि हनीमूनपर्यंत साऱ्याच गोष्टींची चर्चा झाली होती. आता ती प्रेग्नंट असल्याची बातमीही बी- टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.


तसेच सध्या पती रोहनप्रीतला वेळ द्यायचा आहे. खासगी आयुष्य एन्जॉय करायचे आहे. सततच्या शूटिंगमुळे खासगी आयुष्यात वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे सध्या तरी रिएलिटी शोपासून लांबच राहणार असल्याचे तिने सांगितले आहे.त्यामुळे सध्या तरी कोणत्याच शोमध्ये नेहा झळकणार नसल्याचे तिने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. तुर्तास तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चेवर नेहाकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण आलेले नाही.

Web Title: Will Neha surprise her fans by pregnancy news, check this video for revealing the fact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.