तर या मराठी सिनेमाचा बनणार हिंदी रिमेक? हे बॉलिवडूचे कलाकार साकारणार मराठी कलाकारांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 15:54 IST2016-12-12T15:48:55+5:302016-12-12T15:54:04+5:30

काही वर्षापूर्वी मराठी रुपेरी पडद्यावर 'पोश्टर बॉईज' हा सिनेमा झळकला. अभिनेता श्रेयस तळपदेची निर्मिती आणि समीर पाटील यांचं दिग्दर्शन ...

Will this Marathi movie be remade in Hindi? Role of Marathi artists to become an artist of Bollywood | तर या मराठी सिनेमाचा बनणार हिंदी रिमेक? हे बॉलिवडूचे कलाकार साकारणार मराठी कलाकारांची भूमिका

तर या मराठी सिनेमाचा बनणार हिंदी रिमेक? हे बॉलिवडूचे कलाकार साकारणार मराठी कलाकारांची भूमिका

ही वर्षापूर्वी मराठी रुपेरी पडद्यावर 'पोश्टर बॉईज' हा सिनेमा झळकला. अभिनेता श्रेयस तळपदेची निर्मिती आणि समीर पाटील यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा रसिकांना भावला. या सिनेमाच्या यशामुळे 'पोश्टर गर्ल' हा सिनेमाही रसिकांच्या भेटीला आला. मराठीत पोश्टर बॉईजला मिळालेल्या यशामुळे निर्माता श्रेयस तळपदेने या सिनेमाचा हिंदी रिमेक बनवण्याचे ठरवले. या सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये सनी आणि बॉबी हे देओल बंधू झळकणार आहेत. विशेष म्हणजे या हिंदी रिमेकच्या माध्यमातून श्रेयस दिग्दर्शनातही पदार्पण करत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन तर तो करणार आहेच शिवाय निर्माता आणि अभिनयाची धुरासुद्धा तो आपल्या खांद्यावर घेणार आहे.



गाजलेल्या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक रुपेरी पडद्यावर येण्याच्या यादीत 'पोश्टर बॉईज' हा काही एकमेव सिनेमा नाही. काही दिवसांपूर्वी मराठी बॉक्स ऑफिसवर नवनव्या रेकॉर्ड्सची नोंद करणा-या नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या सिनेमाचा हिंदी रिमेक करण जोहर करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यांत रिंकू राजगुरुनं साकारलेली आर्चीची प्रसिद्ध भूमिका श्रीदेवी यांची कन्या जान्हवी साकारणार असल्याचे बोललं जात आहे.




मराठीतील आणखी एक सुपरहिट सिनेमा 'दे धक्का' या सिनेमाचाही हिंदी रिमेक रसिकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केलीय.. या रिमेक सिनेमात अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी साकारलेली भूमिका संजय दत्त करणार असल्याच्या चर्चा आहेत.





पोश्टर बॉईज, सैराट, दे धक्का या सिनेमांप्रमाणे आणखी ब-याच मराठी हिट सिनेमांनी बॉलीवुडकरांवर मोहिनी घातली आहे. मराठी सिनेमा आणि त्याची कथा बॉलीवुडच्या दिग्गजांना भावतेय. यांत सगळ्यात पहिले नाव येते ते अभिनेता सलमान खानचे. मराठीत सुपरहिट ठरलेल्या ‘शिक्षणाचा आयचा घो’ आणि ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या गाजलेल्या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक करण्याची तयारी दर्शवली आहे. बॉलीवुडचा खिलाडी अक्षय कुमार यालाही महेश मांजरेकर यांच्या ‘शिक्षणाचा आयचा घो’ या सिनेमाच्या कथेनं आकर्षित केले आहे. सलमानने या सिनेमाचा हिंदी रिमेक केला नाही तर अक्की हा रिमेक करण्यासाठी तयार आहे.




'नटरंग' या सिनेमानंही बॉलीवुडकरांवर जादू केलीय. या सिनेमाचं कथानक आणि गाणी बड्या निर्मात्यांना भावली आहेत. त्यामुळे नटरंग हिंदीत रिमेक करण्याचं काही निर्मात्यांनी ठरवलंय.. नटरंगमध्ये अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी साकारलेली गुणा कागलकर ही भूमिका हिंदीत अभिनेता रणबीर कपूर साकारणार असल्याचे बोलले जात आहे. या हिंदी सिनेमाचं संगीतही अजय-अतुल यांचेच असणार आहे.




याशिवाय मुंबई-पुणे-मुंबई या मराठी सिनेमाचाही मुंबई-दिल्ली-मुंबई या नावाने हिंदी रिमेक बनणार आहे.. मूळ मराठी सिनेमाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे हेच या हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.. अभिनेता शाहिद कपूर या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार आहे. मराठी सिनेसृष्टीत सुपरहिट ठरलेला आणखी एक सिनेमा म्हणजे नटसम्राट.. अभिनेता नाना पाटेकर यांच्या अभिनयाने नटलेल्या या सिनेमाची दखल बॉलीवुडकरांनाही घ्यावी लागलीय.. नटसम्राट या सिनेमाचाही हिंदी रिमेक लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.. सिनेमातील अभिनेता नाना पाटेकर यांच्या अभिनयाची मुक्तकंठाने प्रशंसा करणारे महानायक बिग बी अमिताभ बच्चन नटसम्राटच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा आहेत.



'झपाटलेला' या सिनेमानंतर महेश कोठारे यांनी झपाटलेला-2 हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आणला.. हा सिनेमाही मराठी रसिकांना भावला.. मराठी रसिकांसोबत बॉलीवुडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनाही झपाटलेला सिनेमाच्या कथेने जणू काही झपाटलं.. त्यामुळंच झपाटलेला सिरीजचे हक्क विकत घेत झपाटलेला-3 हिंदीत रिमेक करण्याची तयारी सुरु केलीय.. मराठीत काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या येड्यांची जत्रा या सिनेमाचाही हिंदी रिमेक बनणार आहे.. या हिंदी रिमेकसाठी परेश रावल, विनय पाठक, सौरभ शुक्ला, राजपाल यादव आणि संजय मिश्रा या कलाकारांशी दिग्दर्शकाची बोलणी सुरु असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठीतील हिट सिनेमांच्या निमित्ताने त्यांचा रिमेक बनण्याचा ट्रेंड बॉलीवुडमध्ये रुढ होऊ पाहतो आहे. त्यामुळे मराठीत सुपरडुपर हिट ठरलेल्या या सिनेमांनी बॉलीवुडच्या रसिकांवरही जादू करावी अशीच अपेक्षा तमाम मराठी रसिकांना असेल.
 

Web Title: Will this Marathi movie be remade in Hindi? Role of Marathi artists to become an artist of Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.