‘ग्रीक गॉड’पूर्ण करेल काय उर्वशीची ही इच्छा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 12:17 IST2016-12-20T12:17:06+5:302016-12-20T12:17:06+5:30

उर्वशी रौतेला सध्या अगदी हवेत आहे आणि का नसावी? शेवटी हृतिक रोशनच्या ‘काबील’मध्ये ‘सारा जमाना हसीनों का दीवाना...’वर ती ...

Will the 'Greek God' complete the desire of Urvashi? | ‘ग्रीक गॉड’पूर्ण करेल काय उर्वशीची ही इच्छा?

‘ग्रीक गॉड’पूर्ण करेल काय उर्वशीची ही इच्छा?

्वशी रौतेला सध्या अगदी हवेत आहे आणि का नसावी? शेवटी हृतिक रोशनच्या ‘काबील’मध्ये ‘सारा जमाना हसीनों का दीवाना...’वर ती सेक्सी आयटम साँग जे तिला मिळालेय. ‘ग्रेट ग्रँड मस्ती’नंतर ‘सारा जमाना हसीनों का दीवाना...’ या आयटम साँगच्या निमित्ताने उर्वशीला एक मोठी संधी मिळाली आहे. पण उर्वशीला आता यापुढचे वेध लागले आहेत.

होय, आता तिला बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशन याच्यासोबत ‘धूम’ वा ‘क्रिश’च्या रिमेकमध्ये काम करण्याची इच्छा आहे.
एका मुलाखतीत उर्वशीने ही इच्छा बोलून दाखवली. मी हृतिकची खूप मोठी चाहती आहे. टायगर श्रॉफपेक्षाही हृतिक मला अधिक आवडतो. त्याची आॅनस्क्रीन हिरोईन बनणे हे माझे स्वप्न आहे, असे तिने सांगितले. ‘सारा जमाना हसीनों का दीवाना...’ या गाण्यासाठी मी परफेक्ट आहे, असे हृतिकला वाटले. त्यामुळे हे गाणे मला मिळाले. मी एका मोठ्या गाण्याचा, मोठ्या प्रोजेक्टचा भाग आहे, हे मला माहित होते. त्यामुळे मी अजिबात नर्व्हस नव्हते. हृतिक आणि राकेश सरांनी मला यादरम्यान मोठा पाठींबा दिला. हृतिकने या गाण्यासाठी मला बºयाच टीप्सही दिल्या. या गाण्याच्या निमित्ताने मी हृतिकसोबत बरेच पर्सनल चॅट केले. त्याचा प्रत्येक शब्द प्रेरणादायी होता. त्याने मला सतत प्रेरणा दिली. मी त्याच्याकडून खूप काही शिकले. हृतिक इज हृतिक, असेही उर्वशी म्हणाली.



एकंदर काय तर उर्वशी सध्या पूर्णपणे ‘हृतिक’मय आणि ‘काबील’मय झालीय. हृतिकची तारीफ करताना ती जराही थकत नाहीय. आता याचे फळ उर्वशीला कुठल्या रूपात मिळते? हृतिकसोबत काम करण्याची संधी तिला कधी व कशी मिळते? या प्रश्नांची उत्तरे सध्या तरी आमच्याकडे नाहीत. येत्या काळात ही उत्तरे मिळतीलच, एवढे मात्र आम्ही खात्रीपूर्वक सांगू इच्छितो.

Web Title: Will the 'Greek God' complete the desire of Urvashi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.