रुग्णाची इच्छा पूर्ण करणार -हृतिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 15:27 IST2016-01-16T01:11:26+5:302016-02-04T15:27:12+5:30

चां गलं काम करण्यासाठी मनात फक्त इच्छा आवश्यक असते. अशीच इच्छा सेलिब्रिटींच्या मनात येणं म्हणजे फारच क्वचित असते. फक्त ...

Will fulfill the patient's wish - Hrithik | रुग्णाची इच्छा पूर्ण करणार -हृतिक

रुग्णाची इच्छा पूर्ण करणार -हृतिक

ं गलं काम करण्यासाठी मनात फक्त इच्छा आवश्यक असते. अशीच इच्छा सेलिब्रिटींच्या मनात येणं म्हणजे फारच क्वचित असते. फक्त पैसा दिल्यानेच मदत करण्यात येऊ शकते असे काही नसते. तर प्रेरणा आणि इच्छाशक्ती वाढवणे ही देखील महत्त्वाची बाब असते. हीच बाब हृतिक रोशनने त्याच्या कृतीतून सिद्ध केली आहे. हृतिक रोशन सध्या जबलपूर येथे 'मोहंजोदाडो' चित्रपटासाठी शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याला एक बातमी मिळाली की, त्या भागात एक कॅन्सर पेशंट असून त्याला हृतिकला भेटायचे आहे. ती काही दिवसांचीच सोबती आहे. जेव्हा हे आशुतोष गोवारीकरला कळाले तेव्हा ते त्याने हृतिकला सांगितले. हृतिक ही तिला भेटण्यासाठी तयार झाला. त्याने त्याच्या हॉटेलवर तिला भेटण्यासाठी बोलावले. खरंच याला म्हणतात माणूसकी.

Web Title: Will fulfill the patient's wish - Hrithik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.