पत्नी परवीन इमरान हाश्मीला का मानते अशुभ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 15:29 IST2017-09-17T09:59:15+5:302017-09-17T15:29:15+5:30
बॉलिवूडमध्ये अभिनेता इमरान हाश्मी ‘अशुभ’ आहे. हे आम्ही नाही तर इमरानची पत्नी परवीन सहानी हिचे म्हणणे आहे. धक्का बसला ...
(13).jpg)
पत्नी परवीन इमरान हाश्मीला का मानते अशुभ?
ब लिवूडमध्ये अभिनेता इमरान हाश्मी ‘अशुभ’ आहे. हे आम्ही नाही तर इमरानची पत्नी परवीन सहानी हिचे म्हणणे आहे. धक्का बसला ना? पण हे खरे आहे. अलीकडे द स्पाटर्न पोकर्स इंडिया पोकर चॅम्पियनशिप पुरस्कार सोहळ्याला इमरानने हजेरी लावली. यावेळी बोलताना इमरानने पत्नी परवीनबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. त्यातलीच एक म्हणजे, परवीन त्याला ‘अनलकी’ म्हणजे अशुभ मानते ही एक गोष्ट. अर्थात इमरानचे हे ‘अनलकी’ असणे केवळ पोकर या खेळापर्यंतच मर्यादीत आहे, हे इथे मुद्दाम सांगायला हवे. पोकर या खेळाबद्दल बोलताना इमरानने या खेळासाठी तो कसा अशुभ आहे ते सांगितले.
पोकरमध्ये मी कधीच जिंकलो नाही पण, माझी पत्नी यात निष्णात आहे. ती मित्रांसोबत पोकर खेळते तेव्हा मला तिच्या जवळपास उभेसुद्धा राहू देत नाही. या खेळात मी परवीनला तिच्यासाठी ‘अनलकी’वाटतो, असे इमरान यावेळी म्हणाला. कोणत्याही खेळात निष्णात होण्यासाठी त्याचा सखोल अभ्यास करण्याची गरज असते. हीच गोष्ट पोकरमध्येही लागू होते, असेही तो म्हणाला. आता नेमकी हीच सखोल अभ्यासाची गोष्ट इमरान कधी मनावर घेणार आहे, हे त्यालाच ठाऊक.
इमरानची त्याची पत्नी ही टिचर आहे. इमरानने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या आधीपासूनच इमरान आणि परवीन यांचे अफेअर होते. इमरानच्या स्ट्रगलच्या काळात ती नेहमीच त्याच्या पाठिशी उभी राहिली आहे. साडे सहा वर्षांच्या अफेअरनंतर २००६ मध्ये दोघांनी लग्न केले. २०१०मध्ये त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव अयान असून काही वर्षांपूर्वी अयानला कर्करोग असल्याचे निदान झाले होते. अयानच्या आजारपणात इमरान आणि परवीनने हार न पत्करता त्याच्या आजारपणाला तोंड दिले. आज अयान पूर्णपणे बरा झाला आहे.
ALSO READ : 'या' कारणामुळे सिरीयल किसर इमरान हाशमी बोल्ड चित्रपटांना देतोय नकार!
इमरान आणि परवीनने मुस्लीम पद्धतीने विवाह केला होता. इमरानचे वडील मुस्लीम असून त्याची आई ख्रिश्चन आहे. परवीन आणि इमरान बॉलिवूडमधील क्यूट कपलमधील एक कपल असून त्या दोघांना अनेक पार्टी, पुरस्कार सोहळ्यांना एकत्र पाहाता येते.