साजिद खानचे का होते वारंवार ब्रेकअप? का सोडून जातात मुली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 11:06 IST2017-08-29T09:14:01+5:302017-08-30T11:06:29+5:30
दिग्दर्शक साजिद खान याच्या आयुष्यात अनेक मुली आल्या. एकापेक्षा एक सुंदर. पण या सुंदर मुलींपैकी एकही टिकली नाही. सगळ्या ...

साजिद खानचे का होते वारंवार ब्रेकअप? का सोडून जातात मुली?
द ग्दर्शक साजिद खान याच्या आयुष्यात अनेक मुली आल्या. एकापेक्षा एक सुंदर. पण या सुंदर मुलींपैकी एकही टिकली नाही. सगळ्या मुली आल्यात आणि आल्या तशाच गेल्यात. आता यामागे कारण काय? काय साजिद एक चांगला बॉयफ्रेन्ड नाही?आता साजिदनेच या प्रश्नांचे उत्तर दिले आहे. होय, मी एक चांगला बॉयफ्रेन्ड नाही, हे साजिदने प्रामाणिकपणे कबुल केले आहे. अर्थात यामागे एक विशेष कारण असल्याचेही त्याने सांगितले आहे. हे कारण काय, तर चित्रपटांवर अतिप्रेम. होय, माझे चित्रपटांवर प्रचंड प्रेम आहे. मी लहानपणापासून चित्रपटांचा दर्दी आहे. मी जगाच्या कानाकोप-यात बनणारा प्रत्येक सिनेमा पाहतो. याचा परिणाम म्हणजे, मी कुठेही असलो तरी चित्रपटांवरच बोलतो. माझ्या गर्लफ्रेन्डला म्हणायला मी डेटवर घेऊन जायचो. पण प्रत्यक्षात आमची ती डेट पर्सनल न राहता फिल्मी डेट बनून जायची. सुरुवातीला प्रत्येकीला ते आवडले. पण पुढे पुढे त्यांना माझ्या या अति फिल्मीपणाचा त्यांना कंटाळा यायचा. मग काय, ब्रेकअप. प्रत्येकीबद्दल हेच घडले, असे साजिदने सांगितले. विशेष म्हणजे, एवढे होऊनही साजिद आपली ही सवय बदलू शकला नाही.
ALSO READ : साजिद खानबद्दल जाणून घ्या 'या' रंजक गोष्टी
माझ्या गर्लफ्रेन्ड मला का सोडून गेल्यात, मला माहितीय. पण तरिही माझी ही सवय मी बदलू शकलेलो नाही. कारण रियल लाईफमध्ये माझी आई आणि सिनेमा हेच माझे पहिले प्रेम आहे. कदाचित त्यामुळे मी फार काळ रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही. इंडस्ट्रीसह बाहेरच्या मुलीही माझ्या आयुष्यात आल्या. पण प्रत्येकीसोबतचे नाते अधुरेच राहिले. हे नाते मुक्कामाला पोहोचेल, असे मला आता वाटत नाही, असेही साजिद म्हणाला.