​का उत्सूक आहे ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’ची स्टारकास्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 13:01 IST2017-03-23T07:31:25+5:302017-03-23T13:01:25+5:30

अभिनेत्री अक्षरा हासन, विवान शहा आणि गुरमीत चौधरी स्टारस ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’ या चित्रपटाची सध्या बरीच ...

Why is the starcast of Laddu Deewana? | ​का उत्सूक आहे ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’ची स्टारकास्ट?

​का उत्सूक आहे ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’ची स्टारकास्ट?

िनेत्री अक्षरा हासन, विवान शहा आणि गुरमीत चौधरी स्टारस ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’ या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा  होतेय. अक्षरा हासन आणि विवान शहा अशी फ्रेश जोडी या चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर दिसणार आहे. अक्षरा, विवान शहा असे सगळेच या चित्रपटाबद्दल उत्सूक आहेत. केवळ अक्षरा व विवाह हेच नाहीत तर चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट चित्रपटाबद्दल कमालीची एक्साईटेड आहे. गुरमीत चौधरी, कविता वर्मा यांच्याशिवाय सौरभ शुक्ला, संजय मिश्रा आणि दर्शन जरीवाला अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात दिसणार आहे.
सौरभ शुक्ला अलीकडे ‘जॉली एलएलबी2’मध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले. खरे तर सौरभ शुक्ला चित्रपटाच्या निवडीबद्दल अतिशय दक्ष म्हणून ओळखले जातात. पण ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’ची कथा ऐकली आणि सौरभ यांनी लगेच या चित्रपटाला होकार दिला. ते सांगतात, या चित्रपटात काम करताना खूप धम्माल आली. जे आम्ही सेटवर केले, तेच पडद्यावरही केले.  संजय मिश्रा यांचेही असेच. संजय मिश्रा यांच्या काही भूमिका अतिशय गाजल्या आहेत. प्रगल्भ अभिनेता अशी ओळख असलेल्या संजय मिश्रा यांनी सुद्धा कथा ऐकताच दिग्दर्शकांना होकार कळवला.

ALSO READ : प्रीती, विद्या, सुश्मितानंतर अक्षरा हासन ‘गर्भवती’!

अलीकडे या चित्रपटाचा ट्रेलर आला. हा ट्रेलर बघता, या चित्रपटात विनोदाची भरमार असणार, असे दिसतेय. याशिवाय चित्रपटातून एक गंभीर संदेश देण्याचा प्रयत्नही दिसतोय. या चित्रपटात अक्षरा एका मॉडर्न शहरी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती यात लाली नावाच्या मुलीची भूमिका साकारतेय. याऊलट विवाह शहा एका लहानच्या गावातील मुलाच्या अर्थात लड्डूच्या भूमिकेत आहे. तर गुरमीत वीर नामक व्यक्तिरेखा साकारतो आहे. वीर हा एक राजकुमार आहे. 
  

Web Title: Why is the starcast of Laddu Deewana?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.