श्रीदेवी यांनी 'बाहुबली'ची ऑफर का नाकारली? बोनी कपूर यांनी सांगितलं खरं कारण, नेमकं काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 17:06 IST2025-09-06T17:00:53+5:302025-09-06T17:06:04+5:30
"तिच्याबद्दल खोटी माहिती...", श्रीदेवींनी 'बाहुबली' नाकारल्याच्या अफवांचं बोनी कपूर यांनी केलं खंडन, म्हणाले...

श्रीदेवी यांनी 'बाहुबली'ची ऑफर का नाकारली? बोनी कपूर यांनी सांगितलं खरं कारण, नेमकं काय म्हणाले?
Bahubali Movie: प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेले 'बाहुबली : द कन्क्लुजन','बाहुबली : द बिगिनींग' हे चित्रपट चांगलेच गाजले. राजामौलींनी साऊथ सिनेमाला ग्लोबल स्तरावर ओळख मिळवून दिली.'बाहुबली' ने बॉक्सऑफिसवरही नवा इतिहास रचला होता.या चित्रपटातील दोन्ही भागातीलही प्रत्येक व्यक्तिरेखा प्रसिद्ध झालेली.जितकी या चित्रपटाची स्तुती करण्यात आली तितकेच याबद्दलचे वादही समोर आले होते. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना बाहुबली या चित्रपटात शिवगामी देवीची भूमिका ऑफर केली गेली होती.ज्या राजमौलींना मान्य नव्हता.श्रीदेवींनी नाकारल्यानंतर ही भूमिका रम्या कृष्णनला मिळाली.याबाबत बोनी कपूर यांनी भाष्य करत अफवांना पूर्णविराम दिला आहे.
दरम्यान, 'बाहुबली' सिनेमासाठी श्रीदेवींनी निर्मात्यांकडे मोठ्या डिमांड्स केल्या होत्या. त्या पूर्ण न झाल्याने त्यांनी चित्रपटासाठी नकार दिला होता, अशा अफवा पसरल्या होत्या. नुकत्याच 'गेम चेंजर' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोनी कपूर यांनी या अफवाचं खंडण केलं आहे. या मुलाखतीमध्ये बोनी कपूर यांनी सांगितलं, श्रीदेवी यांनी बाहुबलीमध्ये काम केलं नाही. पण, त्यावेळी राजामौली आमच्या घरी आले होते आणि त्यांनी श्रीदेवीसोबत चित्रपटासंबधित चर्चा देखील केली होती. त्यानंतर निर्मात्यांनी तिला इंग्लिश विग्लिश चित्रपटापेक्षा कमी मानधनाची ऑफर दिली. ती काही कोणी नवोदित अभिनेत्री नव्हती, तिच्यामुळे तुम्हाला फायदा मिळणार होता. त्यामुळे मी माझ्या पत्नीला असं काम करायला का सांगावं.
त्यानंतर पुढे बोनी कपूर म्हणाले, "निर्मात्यांनी एस.एस.राजामौली यांना श्रीदेवीच्या मानधनाबद्दल खोटी माहिती दिली होती. त्यांनी श्रीदेवीला कमी मानधन देण्याची ऑफर देण्यात आली होती, याबाबतीत ते कधी राजामौलींसोबत बोलले नसावेत. त्यांनी राजामौलींना सांगितलं होतं की तिला हॉटेलचा संपूर्ण मजला हवा आहे आणि तिला एका खास टीमची आवश्यकता आहे. मुळात असं काहीच नव्हतं. आम्ही फक्त त्यांना म्हटलं होतं की शूट तेव्हा ठेवा ज्यावेळी मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या सुरु होतील." असा धक्कादायक खुलासा बोनी कपूर यांनी मुलाखतीमध्ये केला.