सलमान खान 18 नोव्हेंबर 1999 ला करणार होता लग्न, पण घडले असे काही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 13:01 IST2021-05-05T12:57:53+5:302021-05-05T13:01:08+5:30

सलमान आणि संगीता बिजलानी यांनी 1994 मध्ये लग्न करण्याचा विचार केला होता. सलमानचे एकदा नव्हे तर दोनदा लग्न होता होता राहिले.

why Salman Khan cancelled his 1999 wedding even after distributing cards | सलमान खान 18 नोव्हेंबर 1999 ला करणार होता लग्न, पण घडले असे काही...

सलमान खान 18 नोव्हेंबर 1999 ला करणार होता लग्न, पण घडले असे काही...

ठळक मुद्दे999 मध्ये सलमान आणि त्याचा लाडका मित्र साजिद नाडियाडवाला यांनी एकाच दिवशी लग्न करण्याचे ठरवले होते.

सलमान खानला बॉलिवूडमधील मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हटले जाते. सलमान लग्न कधी करणार हा प्रश्न त्याला नेहमीच मुलाखतींमध्ये विचारला जातो. पण सलमान या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे पसंत करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, सलमानचे एकदा नव्हे तर दोनदा लग्न होता होता राहिले.

सलमान आणि संगीता बिजलानी यांचे अनेक वर्षं अफेअर होते. त्यांनी 1994 मध्ये लग्न करण्याचा विचार देखील केला होता. पण लग्नाच्या काही दिवस आधी त्यांचे लग्न मोडले. त्यानंतर 1999 मध्ये सलमान आणि त्याचा लाडका मित्र साजिद नाडियाडवाला यांनी एकाच दिवशी लग्न करण्याचे ठरवले होते. साजिदने लग्न केले. पण ऐनवेळी सलमानने त्याच विचार बदलला.

साजिदनेच द कपिल शर्मा शोमध्ये याविषयी सांगितले होते. त्याने सांगितले होते की, सलमानचे वडील सलीम खान यांच्या वाढदिवसाच्यादिवशी सलमानने लग्न करण्याचे ठरवले होते. त्यावेळी त्याच्या आयुष्यात एक मुलगी देखील होती. मी आणि त्याने एकाच दिवशी लग्न करावे अशी त्याची इच्छा होती. त्याप्रमाणे सगळी तयारी देखील झाली. पण लग्नाच्या चार-पाच दिवसांपूर्वी सलमानने त्याचा विचार बदलला. मी ठरलेल्या दिवशीच लग्न केले. माझ्या लग्नात येऊन सलमान मला मस्करीत बोलला देखील होता की, बाहेर गाडी उभी आहे, तुला पळायचे असेल तर पळ...

Web Title: why Salman Khan cancelled his 1999 wedding even after distributing cards